Home पंढरपूर बाळासाहेब आंबेडकर यानी केलेल्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला यश; तर मनसे अध्यक्ष...

बाळासाहेब आंबेडकर यानी केलेल्या विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलनाला यश; तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिष्टाई आली कामी.

357
0

वंचित बहुजन आघाडीच्या मागणीला यश

पंढरपूर :- आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले पाडव्या पासून महाराष्ट्रातील सर्व मंदिर मजिद देवालय सर्व धार्मिक स्थळे सुरू होणार यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूरच्या सिद्धेश्वर मंदिरा जवळ जल्लोष उत्सव साजरा करण्यात आला.
पंढरपूर मध्ये देखिल सागर गायकवाड यांनी विठ्ठल मंदिरासमोर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता आनंद दादा चंदनशिवे जिल्हा अध्यक्ष नानासाहेब कदम शहराध्यक्ष गणेश भाऊ पुजारी कोषाध्यक्ष बबन शिंदे महाराष्ट्र राज्य महिला सदस्या अंजनाताई गायकवाड रवी थोरात शिवाजी आप्पा बनसोडे सुहास सावंत भीमा मस्के करण वाढवे बाबा गायकवाड सुरज मस्के सुजाता वाघमारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सोबत गेलेल्या शिष्टमंडळास आले यश

आगामी कार्तिकी यात्रेच्या अनुषंगाने वारकरी संप्रदायाची भूमिका योग्य असून ती शासनापर्यंत पोचवण्यासाठी  आपण स्वतः प्रयत्न करणार आहे, असे आश्वासन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या शिष्टमंडळास दिले होते. त्याचाच एक भाग म्हणून सरकारने मंदिरे उघडण्याची घोषणा केल्यामुळे सरचिटणीस दिलीप धोत्रे यांच्या सोबत गेलेल्या त्या शिष्टमंडळाच्या मागणीस यश मिळाले आहे.

वारकरी संप्रदाय कार्तिकी यात्रा समन्वय समिती शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत कृष्णकुंज येथे बैठक पार पडली होती.यामध्ये आषाढी यात्रेसाठी वारकरी संप्रदायाने अनेक निर्बंध सोसत शासनास सहकार्य केले होते.मात्र आता बाजारपेठांसह सर्व गोष्टी खुल्या  होत असताना येत्या कार्तिकी  यात्रेसाठी शासनाने निर्बंध लादू नयेत या करिता  स्वतः संप्रदायाने कार्तिकी यात्रा नियोजन आराखडा तयार केला आहे.त्यानुसार यात्रा पार पाडावी. अशी मागणी पत्रकार परिषदेद्वारे केली होती. त्यास प्रतिसाद देत वारकरी संप्रदायाला चर्चेसाठी आमंत्रित करत संप्रदायाची भूमिका राज ठाकरे यांनी समजून घेतली.

या बैठकीस मनेसेच बाळनांदगावकर,नितीन सरदेसाई, दिलीप धोत्रे, राणा महारास वासकर, चैतन्य महाराज देहूकर, निवृत्ती महाराज नामदास, भागवत महाराज चवरे, रंगनाथ महाराज राशीनकर, विठ्ठल महाराज चवरे, भरत महाराज आलीबागकर,श्याम महाराज उखळीकर आदी उपस्थित होते.
मनसेने सध्या अनेक उपयुक्त प्रश्नाबाबत आवाज उठवीत सरकार कडे पाठपुरावा करून मागणी मान्य करण्याचा सपाटा सुरू केला आहे.त्यामुळे राज ठाकरे यांनी याबाबत महाविकास आघाडीचे नेते खा. शरद पवार आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून मंदिरे उघडण्याची मागणी केली होती.
सध्या सक्षम विरोधक म्हणून अनेक घटकातील लोक आपल्या समस्या सोडवून घेण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे ओढा वाढू लागला आहे.