Home पंढरपूर पंढरपूरात साजरा झाला “अभिजात” पत्रकार दिन.

पंढरपूरात साजरा झाला “अभिजात” पत्रकार दिन.

361
0

पंढरपूर

लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा देशाच्या विकासामध्ये मोठा वाटा आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. अहोरात्र कष्ट करीत छोट्यातील छोटी बातमी ाचकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पत्रकार करतो. गावाच्‍या आर्थिक,राजकीय, धार्मिक ,सांस्कृतिक,शैक्षणिक, कृषी या माध्यमातून विकास करण्यासाठी पत्रकार धडपडत असतो. बाळशास्त्री यांचा जन्मदिवस म्हणजे प्रत्येक पत्रकाराला हवाहवासा वाटणारा दिवस. पंढरपूर शहर तालुक्यांमध्ये पत्रकार दिन प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या कार्यक्रमांचे नियोजन पत्रकार संघाच्या वतीने केले जाते.

शेतामध्ये राबराब राबणाऱ्या बैलाला देखील बैलपोळ्याच्या दिवशी सजवले जाते. त्याच्या कामाला सुट्टी दिली जाते. मात्र पत्रकारांची अवस्था यापेक्षा बिकट आहे. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन पत्रकार संघाला करावे लागते. वर्षभर राजकीय नेते,मंत्री, समाजसेवक, पुढारी, अधिकारी यांच्या बातम्या प्रसिद्ध करणाऱ्या पत्रकाराला साधे एक गुलाबाचे फुल देऊन कृतज्ञता व्यक्त करण्याची दानत आजही पंढरपूरमध्ये कुठे दिसून आली नाही. मात्र यावर्षी ही परंपरा मोडीत निघाली. पंढरपूरचे युवा उद्योजक अभिजित पाटील यांनी पत्रकारांचा आपल्या कार्यालयांमध्ये बोलून सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये यथोचित सन्मान केला. हा मान म्हणजे पत्रकारांसाठी खरा पत्रकार दिन ठरला. हार , श्रीफळ, भेट वस्तू देऊन एक कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.

पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांमध्ये पत्रकारांच्या वतीने आलेल्या आमंत्रित निमंत्रित पाहुण्यांचा सत्कार केला जातो. त्यांच्याकडून पत्रकारितेचे उपदेश घेतले जातात. पण कधीही पंढरपूरच्या कुठल्याच पुढाऱ्याला पत्रकारांना एक गुलाब पुष्प देऊन आभार मानावेत असे वाटले नाही. अभिजीत पाटलांनी शहर तालुक्यात काम करणाऱ्या संपादक- उपसंपादका पासून ते वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या प्रत्येकाला यथोचित मानसन्मान देऊन आपल्याच कार्यालयामध्ये पत्रकार दिन साजरा केला. नव्या उमेदीच्या उद्योजकाने अनेक वर्षांची परंपरा मोडीत काढली आणि एक नवा आदर्श पंढरपूरच्या राजकारणात,समाजकारणात,उद्योग क्षेत्रात वावरणाऱ्या पुढाऱ्यांना समोर ठेवला नक्कीच हा आदर्श प्रत्येकाने घ्यावा असाच “अभिजात” आहे. त्यांच्या या कार्यक्रमाचे पत्रकारितेच्या वर्तुळात कौतुक होत आहे.