Home पंढरपूर भिमाची रणधुमाळी ; पहिल्या कलानुसार खासदार महाडिकांची परिचारक – पाटलांना धोबीपछाड

भिमाची रणधुमाळी ; पहिल्या कलानुसार खासदार महाडिकांची परिचारक – पाटलांना धोबीपछाड

424
0

पंढरपूर :- भिमा सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सोलापुरात आज सुरुवात झाली आहे. रविवारी झालेल्या मतदानामध्ये 78.87 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. 15 जागांसाठी 35 उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख लढत ही भाजपचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनल मध्ये आहे. पहिला कलानुसार खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयाची हॅट्रिक होण्याची शक्यता आहे.
आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीमध्ये झालेल्या मतमोजणीत खासदार धनंजय महाडिक यांच्या पॅनलला 3 हजार 577 मतांची आघाडी असल्याची प्राथमिक माहिती महाडिक गटाकडून देण्यात आली आहे.

मतदान आकडेवरी

पहिल्या फेरीत आंबेचिंचोली, पुळूज शंकरगाव, फुलचिंचोली, विटे उचेठाण, ब्रह्मपुरी, टाकळी, पेनुर, पाटकुल, वरकुटे, तांबोळे, सौंदणे, मगरवाडी आणि तारापूर या गावातील मतमोजणी पूर्ण झाली आहे.


भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मतदारांनी देखील तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे दिसत आहे.