Home पंढरपूर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांना मोठा धक्का

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांना मोठा धक्का

570
0

भोसे सोसायटीमध्ये पाटील गटाचा दारूण पराभव

पंढरपूर :- (ता.पंढरपूर) येथील सोसायटी निवडणूकीमध्ये सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश पाटील यांच्या गटाचा दारुण पराभव झाला आहे.
येथील जानुबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी ची सुरसे ने निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये पाटील विरोधी गटाची सोसायटीवर सत्ता आली आहे.

सोसायटीच्या सत्ता परिवर्तनामुळे पहिल्यांदाच पाटील गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जाते.
स्वर्गीय राजू बापू पाटील यांचे भोसे व परिसरातील विविध सहकारी संस्थांवर गेल्या अनेक वर्षांपासून वर्चस्व आहे.
राजू बापू पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडे पाटील गटाची सूत्र आले आहेत.
दरम्यान भुसे सोसायटी मध्येच पाटील गटाचा दारुण पराभव झाल्याने गणेश पाटील यांच्या भविष्यातील राजकारणाला शह बसल्याचे मानले जाते.
जानुबाई विविध कार्यकारी सेवा सोसायटी वर पाटील गटाची गेल्या अनेक वर्षात वर्षापासूनची सत्ता होती.
या निवडणुकीमध्ये पाटील विरोधी गटाचे बाळासाहेब माळी,, प्रा. महादेव तळेकर, अजय जाधव , हनुमंत मोरे,ॲड. नितीन खटके, प्रा. तुकाराम मस्के, संजय तळेकर, राजकुमार टरले, बळीराम थिटे, भारत कोरके, सज्जन भोसले, मारुती कोरके, मोहन तळेकर यांनी एकत्र बैठक बोलावून चर्चा केली. या निवडणुकीस पूर्ण ताकतीने सामोरे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रमाणे या निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली. १९६ मतदार असणाऱ्या या सोसायटीची ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची बनवली. पाटील पार्टीने तर जेवणावळीही घातल्या.

मोठ्या चुरशीने झालेल्या या निवडणुकीत जानुबाई देवी विकास पॅनलने, पाटील गटाच्या जानुबाई देवी बचाव पॅनलला धूळ चारली. पाटील विरोधी गटाचे सुनील कुलकर्णी, बबन फाळके, नवनाथ सरडे, भास्कर तळेकर, हरिचंद तळेकर, विलास तळेकर, अभिमान थिटे, रामदास माळी, विद्युलता कोरके, भगीरथी माळी, अनिल गावडे, चांगदेव शिंदे, आदी १२ उमेदवार विजयी झाले. गौतम थिटे आणि पाटील गटाच्या नागेश गावंधरे यांना समसमान ८३ मते मिळाली. यासाठी चिठ्ठी काढण्यात आली आणि, पाटील गटाच्या नागेश गावंधरे यांना विजयी घोषित करण्यात आले, आणि या तेराव्या जागेचा फटका पाटील विरोधी गटास बसला.

सोसायटीच्या या निवडणुकीत पाटील विरोधी गटाच्या दैदिप्यमान विजयासाठी गणेश सरडे, सतीश तळेकर, युवराज सरडे, नवनाथ माळी, आप्पा थिटे, बाळकृष्ण थिटे, राजाराम मुळे, बाळू जाधव, बंडू मुळे, राजु व्यवहारे, चांगदेव तळेकर, सोमनाथ सरडे, जयवंत थिटे आणि कांचन कोरके यांनी जोरदार परिश्रम घेतले.