Home पंढरपूर Big Breaking …..पंढरपूरात धारधार शस्त्राने वार करुन खून .

Big Breaking …..पंढरपूरात धारधार शस्त्राने वार करुन खून .

2224
0

पंढरपूर:- पंढरपूर शहरातील कुंभार गल्ली मध्ये एका विवाहितेचा धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली. निकिता आकाश पवार (वय 21 राहणार कुंभार गल्ली पंढरपूर) असे या विवाहितेचे नाव आहे.
आज पहाटेच्या सुमारास ही हत्या झाल्याचे समजते. विवाहित महिलेच्या पोटावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आणि यामध्ये तिचा मृत्यू झालाय.
घटनेची माहिती कळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, शहर पोलीस निरीक्षक अरुण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याप्रकरणी तात्काळ एकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. घडल्या प्रकाराने परिसरात एकच खळबळ माजली. कोणत्या कारणासाठी हा खून केला गेला याचा तपास पोलीस करत आहेत.