Home पंढरपूर पंढरपुरात भाजपची धुरा तरुण आणि बहुजन चेहऱयांवर, नव्या निवडी जाहीर.

पंढरपुरात भाजपची धुरा तरुण आणि बहुजन चेहऱयांवर, नव्या निवडी जाहीर.

1616
0

पंढरपूर :- अनेक दिवस प्रलंबित असणारी सोलापूर जिल्हा भाजपा कार्यकारणी आज जिल्हा अध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी जाहीर केली. पंढरपुर शहराध्यक्ष पदी नगरसेवक विक्रम लक्ष्मण शिरसाट तर तालुकाध्यक्ष पदी भास्कर दादा कसगावडे यांची निवड करण्यात आलीय. तर अनुसूचित जाती – जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदी लक्ष्मण तात्या धनवडे यांची नियुक्ती करण्यात आलीय. जिल्हा उपाध्यक्ष पदावर सुभाष मस्के यांना संधी देण्यात आलीय. आमदार प्रशांत परीचारकांसह सर्व आमदार , खासदार हे विशेष निमंत्रित सदस्य असणार आहेत.
या निवडीच्या माध्यमातून भाजपने बहुजन समाजाला पक्ष संघटनेत स्थान दिले आहे.
गुरूवार आणि शुक्रवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर ग्रामीण आणि शहरात पक्षाच्या पदाधिकाऱयांच्या बैठका घेतल्या. सल्ला, कानपिचक्या आणि इशारे देत त्यांनी संघटना बांधणीवर लक्ष दिले.
आज जिल्हातील सर्व निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. आगामी जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडी करण्यात आल्याचे दिसत आहे.
पंढरपुर शहराध्यक्ष पदी मास लीडर म्हणून ओळख असलेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसाट यांचे चिरंजीव विद्यमान नगरसेवक विक्रम यांची निवड करण्यात आलीय. शिरसाट पिता-पुत्रांचा पंढरपुर शहाराबरोबरच ग्रामीण भागातही मोठा जनसंपर्क आहे. अडचणीत धावून जाणारे नेते म्हणून यांना पाहिले जाते.
तर भास्कर कसगावडे हे ग्रामीण भागातील युवा नेते आहेत. सहकार, उद्योग, शेती यांच्यासह राजकारण आणि समाजाकारणातील मोठे नाव आहे. दांडगा जनसंपर्क आणि युवकांमध्ये असलेली दादा म्हणून ओळख हीच यांची बलस्थाने आहेत.
अनुसूचित जाती – जमाती मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा जाणते नेते लक्ष्मण तात्या धनवडे यांच्या खांद्यावर सोपवली आहे. जनतेच्या समस्यांसाठी संघर्ष करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. धरणग्रस्थानच्या प्रश्नासाठी कायम लढा देत त्यांनी तालुक्यात आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे विणले आहे.
आजच्या निवडी भाजपला आगामी काळात मोठी ताकत मिळवून देतील. तसेच पंढरपूरचे बादलसिंह ठाकूर ,चांगदेव कांबळे यांना देखील संधी देण्यात आली आहे.