Home पंढरपूर भाजपकडून अखेर आवताडेंना उमेदवारी; अवताडेंचा अर्ज भरण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मोहितेपाटील...

भाजपकडून अखेर आवताडेंना उमेदवारी; अवताडेंचा अर्ज भरण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मोहितेपाटील यांच्यासह बडे नेते रहाणार हजर

1420
0

पंढरपुर – राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके याच्या निधनानंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून समाधान महादेव आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे
या निवडणुकीत महाविकास आघाडी कडून भालके विरुद्ध अवताडे असा सरळ सामना रंगणार आहे. एकास एक उमेदवार समोर असल्याने भाजपाने सहानुभूतीच्या लाटेत ही परिचारक-आवताडेंना एकत्र आणत महाविकास आघाडी समोर तगडे आव्हान उभे केले आहे. मंगळवारी समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वता विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजयसिह मोहिते पाटील यांच्यासह जिल्हयातील बडे नेते हजेरी लावणार आहेत.

पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार असलेले समाधान आवताडे यांनी 2014 ला शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. तर 2019 ला ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. दोन्ही निवडणुकीत त्यांना जवळपास 55 हजार पर्यंत मते पडली होती.

समाधान आवताडे हे उद्योजक आहेत. या पोटनिवडणुकीत भाजपा कडून आ. प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती मात्र भाजपा च्या वरिष्ठांनि परिचारक यांना थांबविण्यात यश मिळविले आहे. आमदार परिचारक गटाने समाधान अवताडे याना पाठिंबा देण्याचे मान्य करत पंढरपुर शहर सह 22 गावातून मताधिक्य देण्याचा शब्द पक्षश्रेष्ठींना दिला आहे. त्यामुळेच अवताडेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.

या पोटनिवडणूकित महाविकास आघाडी कडून भालके कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी जवळपास निश्चित आहे. मात्र आघाडीमध्ये मध्ये फूट पडली आसून शिवसेना व स्वाभिमानीने बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवाय वंचीत बहुजन आघाडी, एमआयएम, यांच्यासह अनेक अपक्ष उमेदवार रिंगणात असणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मोठी रंगत निर्माण होणार आहे.

परिचारक अवताडें यांचे मनोमिलन करण्यात यश मिळाल्यानंतर समाधान अवताडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा विनायसिंह मोहितेपाटील, माजी मंत्री विजय देशमुख, सुभाष देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते पाटील आ. प्रशांत परिचारक. आ राजा राऊत. यांच्यासह बडे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी कृषिविभागाच्या हेलिपॅड शेजारी असलेल्या आलिशान श्रेयस पॅलेस कार्यालयात मेळावा होण्याची ही शक्यता आहे.