Home पंढरपूर भाजपा पदाधिकारी मारहाण प्रकरण ; विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर...

भाजपा पदाधिकारी मारहाण प्रकरण ; विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर ऍक्शन मोडवर. दोन दिवसात पंढरपूर दौऱ्यावर.

696
0

पंढरपुर:- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजप नेत्याला शिवसैनिकांनी तोंडाला काळे फासून मारहाण केली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते शिरीष कटेकर यांना झालेल्या मारहाणीची पडसाद भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणी मध्ये उमटले. माजी खासदार किरीट सोमय्या आणि आमदार राम कदम यांनी मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली . त्यानुसार शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आणि एका दिवसात यांची जामिनावर मुक्तता देखील झाली. मात्र सरकारच्या दबावाखाली पोलिसांनी थातूरमातूर कलमे लावल्याने शिवसैनिकांना जामीन मिळाला असा आरोप आता गिरीश कटेकर यांनी केला. आपल्या डोळ्याला इजा झाल्याने आपली दृष्टी गेल्याचा दावा करत यांनी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपोषण सुरू केलेला आहे.

दरम्यान 12 तारखे रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे कटेकर यांची विचारपूस करण्यासाठी पंढरपुरात येणार आहेत अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष भास्कर कसगावडे यांनी दिलीय. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भेटून मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करणार असल्याचे समजते. दरेकर हे 11 फेब्रुवारी रोजी पंढरपूर मुक्कामी असून 12 तारखेला दुपारपर्यंत ते भाजपा पदाधिकाऱ्यांची संवाद साधून कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. एकंदरीतच एका ज्येष्ठ नेत्याला केलेली मारहाण भाजपने चांगलीच मनावर घेतली असून याचे पडसाद थेट विधानभवनात उमटणार असल्याचे बोलले जात आहे. कटेकर मारहाण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर दखल घेतली असली तरी स्थानिक भाजप मात्र कटेकरांच्या पासून चार हात लांबच असल्याचे दिसून येत आहे.