Home पंढरपूर भाजप जिल्हाध्यक्षांचे सामाजिक भान हरपले; कोरोना महामारीच्या काळात वाढदिवसावर लाखो रुपयांची...

भाजप जिल्हाध्यक्षांचे सामाजिक भान हरपले; कोरोना महामारीच्या काळात वाढदिवसावर लाखो रुपयांची उधळण.

1333
0

पंढरपूर :- पाच महिने झाले देश कोरोनाच्या चक्रव्यूहमध्ये अडकलाय. शेतकरी, मजूर , कष्टकरी इतकेच काय तर अनेक मोठे व्यवसायिक आर्थिक अडचणीत आडकले आहेत. देशासह राज्यात सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढताहेत. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे ३१ ऑगस्ट रोजी निधन झाले. केंद्रातील भाजप सरकारने देशात सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला. राज्य, जिल्ह्यातील जनता अडचणीत असताना सोलापूरच्या भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना याचे भान राहिलेले दिसत नाही. आज श्रीकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. तसेच लाखो रुपयांची उधळण फक्त स्वतःची जाहिरात करण्यासाठी केली आहे.

सोलापूर जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या २० हजारांवर पोहचलीय. दररोज रुग्ण मरत आहेत. श्रीकांत देशमुखांच्या सांगोल्यात कोरोना बाधितांची संख्या सातशेच्या जवळ गेलीय. आठ सांगोलकरांनी आपला जीव गमावलाय. पुरेशी वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने दररोज कोरोना रुग्णांचा मृत्यू होतोय. संपूर्ण जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावत आहेत. देशमुख यांनी प्रधानमंत्री मोदी यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाढदिवसांवर लाखोंची उधळपट्टी न करता कोरोनाच्या वैद्यकीय सुविधांसाठी दिल्या असत्यातर जिल्ह्यात एक देशमुख पॅटर्न तयार झाला असता. मात्र एकाबाजूला शेतकरी, मजूर, कष्टकरी जनतेसाठी आंदोलन करायचे. कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत म्हणून सरकारवर टीका करायची रस्त्यावर वर यायचे. तर दुसरीकडे सामाजिक भान टाळून पैशांची उधळण करायची. हे भाजप सारख्या शिस्तप्रिय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना न शोभणारी बाब आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून देशमुखांवर सामान्य नागरिक नाराज आहे. अध्यक्ष झाल्यानंतर देशमुखांना पहिले काम केले ते म्हणजे पी ए नेमण्याचे. देशमुखांनी तब्बल दोन पी ए नेमले आहेत. सामान्य व्यक्तीने फोन केल्यावर फक्त पी एच बोलतो. खुप व्हीआयपी व्यक्ती असेलतर जिल्हाध्यक्ष स्वतः फोन घेतात. देशमुखांच्या या पीएगिरीने मुळातच जनता नाराज आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुखांचे सामाजिक भान, जबाबदारी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या काळात माजी उपमुख्यमंत्री विजय दादा, आमदार रणजित दादा यांचे वाढदिवस झाले. मात्र त्यांनी समर्थकांना कोणताही वायफळ खर्च न करता वैद्यकीय सोयीसुविधा देण्याचे आवाहन केले होते. त्याचीच प्रचिती म्हणजे अकलूजचे तब्बल १०० बेडचे कोवीड सेंटर. देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जिल्ह्याचे जेष्ठ नेते माजी सुधाकरपंत परिचारकांसह शेकडो नागरिकांचे निधन होत असताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांना याचे काहीच सोयरेसुतक नाही का? काही काहीसा धडा सोलापूर शहरातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखिल गिरवला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेंचा वाढदिवस देखिल त्याच थाटात साजरा करण्यात आला.
महामारीने रोज लोक मरत असताना स्वतःला जनतेचे तारणहार म्हणून मिरवणारे राजकीय नेते थोडी तरी लाज बाळगणार का? असाच सवाल आणि संताप सामान्य नागरिकांमधून व्यक्त केला जातोय.

मी सध्या बाहेर आलोय. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर माझ्या वाढदिवसनिमित्ताने कोणीही हार,तुरे सत्काराचे कार्यक्रमाचे आयोजन करु नये. असे आवाहन मी सोशल मिडियाच्या माध्यमातून केले होते. मात्र कार्यकर्त्यांनी परस्पर काही नियोजन केले आहे. त्याची मला माहिती नाही. असा खुलासा भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केलाय.