Home पंढरपूर पंढरपूरात १२ तासात कोरोनाचा विळखा आणखी वाढला. भाजप शहराध्यक्ष वाईकरांचा कोरोनाने...

पंढरपूरात १२ तासात कोरोनाचा विळखा आणखी वाढला. भाजप शहराध्यक्ष वाईकरांचा कोरोनाने मृत्यू.

1626
0

पंढरपूर:- पंढरपूर शहरामध्ये 12 तासात 21 नव्या कोरुना बाधित रुग्णांची भर पडली. पंढरपूर तालुक्याचे रुग्ण संख्या आता 380 वर पोहोचलीय. पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधित सहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज भाजपाचे शहराध्यक्ष व दैनिक निर्भिड आपलं मतचे संपादक संजय वाईकर यांचा कोरोनामुळे सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू झालाय.

पंढरपूर शहरांमध्ये आज सापडलेले 21 रुग्ण हे गांधी रोड परिसरातील एक, आयडीबीआय बँक खवा बाजार एक, तानाजी चौक सहा, विजापुरे गल्ली तीन, लक्ष्मीनारायण चौक एक, गोविंदपुरा सात, जुनी पेठ एक, घोंगडी गल्ली एक, असे रुग्ण आढळून आलेले आहेत.

पंढरपूर मध्ये 120 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर शहरामध्ये 274 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
पंढरपूरची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आता पंढरपूरकरांनी प्रशासनाच्या नियमांचे कडक पालन करीत, स्वयंशिस्त हि पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.