Home पंढरपूर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरात सहा दिवसांचा लॉकडाऊन!.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूरात सहा दिवसांचा लॉकडाऊन!.

8943
0

पंढरपूर:- पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंढरपुरात सहा दिवसांचा लॉकडाऊन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली. आज पंढरपूर येथे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक आयोजित केली असून या बैठकीमध्ये 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट या कालावधीमध्ये कडक लॉकडाऊन बाबत निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी सोलापूर डेलीशी बोलताना दिली.

कोरोना चा प्रादुर्भाव वाढल्यापासून तीन महिने पंढरपूर मध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नव्हता.
मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पंढरपुरात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळून आला. आज ही संख्या पाचशे च्या पुढे पोहोचली आहे. रुग्ण सापडलेल्या भागांमध्ये कंटेनमेंट झोन करून प्रशासनाने ही साखळी तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य असा प्रतिसाद न मिळाल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे.
अखेर आता पंढरपूर लॉकडाउन करणे हा एकमेव पर्याय प्रशासनासमोर आहे. आज जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाची चर्चा करून जिल्हाधिकारी लॉकडाऊन चा निर्णय जाहीर करतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
एक ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि मुस्लीम धर्मीयांचा बकरी ईद हा सण आहे. तर 3 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्याने 4 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे.