Home पंढरपूर कोरोनाचे ट्वेंटी – ट्वेंटी मध्ये अर्धशतक तर कसोटी मध्ये द्विशतक पुर्ण .

कोरोनाचे ट्वेंटी – ट्वेंटी मध्ये अर्धशतक तर कसोटी मध्ये द्विशतक पुर्ण .

601
0

पंढरपुरात कोरोना रुग्णाचे द्विशतक पूर्ण

एकाच दिवशी ५० रुग्ण ; १२० जणांचे प्रलंबीत अहवाल 

पंढरपूर : २० जुलै रोजी २०३ कोरोना रुग्णांचा तपासणी अहवाला आला आहे. त्यामध्ये ८१ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर ५० जणांचा अहवाल पोझीटिव्ह अहवाल प्राप्त झाला. यामुळे पंढरपुरातील एकूण बाधीतांची संख्या २११ झाली आहे.

२० जूलैपर्यंत १ हजार ७८१ लोकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १६६१ लोकांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे.  यामध्ये १४५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्याचबरोबर १२० जणांचे तपासणी अहवाल प्रलंबीत आहेत. तर २११ लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड केअर सेंटरमध्ये १२५ जणांवर तर उपजिल्हा रुग्णालयात २३ जणांवर उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर सोलापूर – १२, पुणे – १, अकलूज – १, मंगळवेढा १ असे एकूण १५ जण उपचार घेत आहेत. रुग्णालयातून बरे होऊन घरी केलेल्या बाधितांची संख्या ४६ आहे. त्याचबरोबर २०५ लोकांना संस्थात्मक कॉरंटाईन करुन ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली.

आज या भागात सापडले कोरोना पॉझीटिव्ह

कालिका देवी चौक, संतपेठ, गांधी रोड, इसबावी, जुनीपेठ रामबाग रोड, आनंद नगर श्रीराम नगर, मनीषा नगर, महावीर नगर, घोंगडे गल्ली, पोलीस लाईन,उमदे गल्ली, काशी कपडी गल्ली, लक्ष्मिनगर, रोहिदास चौक, हरिनारायण पार्क, ग्रामीण भगामध्ये भोसे, तारापूर, भटूबरे या गावांचा सहभाग आहे.