Home पंढरपूर पंढरीत मध्यवर्ती ठिकाणी फळे विक्री करणाऱ्याला कोरोनाची बाधा.

पंढरीत मध्यवर्ती ठिकाणी फळे विक्री करणाऱ्याला कोरोनाची बाधा.

5774
0

पंढरपूर:- पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर चौका मधील फळ विक्रेत्याला कोरोनाची बाधा झालीय. चार दिवसापूर्वी कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने सदरचा फळविक्रेता तरुण कोविड टेस्ट करून घेण्यासाठी उस्मानाबाद येथे आपल्या सासुरवाडीला गेला होता असे समजते. त्याठिकाणी त्याचा अहवाल पॉझिटिव आलाय.


कोरोना अहवाल आलेल्या तरुण हा स्वातंत्र्यवीर सावरकर चौक महाराष्ट्र बँकेच्या खाली फळ विक्रीचा व्यवसाय करतो. त्याचे घर हे संतपेठ मधील जगदंबा वसाहत येथे आहे. चार दिवसापूर्वी सर्दीचा प्रचंड त्रास होत असल्याने त्याने थेट उस्मानाबाद गाठले. रुग्णालयामध्ये दाखल केल्यानंतर त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. आज त्याचा उस्मानाबाद येथे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. उस्मानाबाद मधील प्रशासनाने तात्काळ ही माहिती पंढरपूर नगरपालिकेला कळवली अशी माहिती पुढे येत आहे. नगरपालिका प्रशासनाने तात्काळ त्याच्या कुटुंबाशी संपर्क साधला असून त्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना देण्यात आले आहेत. तर संतपेठ मधील जगदंबा वसाहत भाग हा कंटेनमेंट झोन करण्यात आला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात या रुग्णाचा व्यवसाय असल्याने याची साखळी वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे.
गेल्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये या फळ विक्रेत्याकडून फळ खरेदी करणाऱ्यांनी नगरपालिकेला तात्काळ माहिती द्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.