Home पंढरपूर कोरोना काळात पंढरीच्या तहसिलदारांनी चालवले अनेकांचे संसार …..

कोरोना काळात पंढरीच्या तहसिलदारांनी चालवले अनेकांचे संसार …..

1059
0

वैशाली वाघमारे यांची खेडला बदली.

पंढरपूर : देशावरच नव्हे तर जगावर कोरोनाने महा भयंकर संकट आले होते. देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर अनेकांच्या हाताचे काम गेले. महिनाभर अर्धा भाकरीवर गुजराण झाली पण त्यानंतर उपासमारीची वेळ पंढरपुरातील काही कुटुंबांवर आली. या काळात स्थलांतरित लोकांच्याअन्न, वस्त्र, निवाऱ्याची जबाबदारी तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यावर होती. याच काळात वाघमारे यांनी अनेकांचे संसार चालवले. वाघमारे यांची पुणे जिख्यातील खेड येथे बदली झालीय.

याबाबत सविता कांबळे, रुकसाना बागवान या महिला सांगतात, ते दिवस खूपच कठीण होते. केंद्रे महाराज मठात तामिळनाडू मधील विद्यार्थ्याच्या राहण्याची सोय केली होती. आम्ही महिला काही मदत मिळते का ? हे पाहण्यासाठी मठात गेलो . आणि आमची गाठ तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्याशी पडली. घरगाडा चालविताना काय कसरत करावी लागते हे दुःख एका महिलेलाच माहिती असते. आमच्या वेदना ऐकून तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्यातील महिला जागी झाली. आम्हाला पुढील तीन महिन्याचे धान्य, संसारोपयोगी साहित्य भरून दिले. आमच्यासाठी वाघमारे ताई देवदूत बनुनच आल्या. अशा तहसीलदारांची आता बदली झालीय. मात्र पंढरपूरातील मजूर, कष्टकरी जनतेला दिलेला आधार कायमच स्मरणात राहील. अशा आठवणी महिलांनी जागवल्या.

तसेच कोरोना काळात राज्यात प्रथम पंढरपुरात लोकवर्गणीतून हायटेक पध्दतीचे कोविड सेंटर उभारले होते.

पंढरपूरच्या तहसिलदार वैशाली वाघमारे  एक वषार्हून अधिक काळ वाघमारे यांनी पंढरपूरच्या तहसिलदार म्हणून काम पाहिले.

अडचणी घेऊन येणारे सामान्य नागरीकांना त्यांच्या कार्यालयात थेट प्रवेश होता.  मात्र  चुकीचे कामे घेऊन येणाºया पुढाºयांना त्यांनी अनेकवेळा बाहेरचा रस्ता दाखवला होता. यामुळे त्या सतत चर्चेत असत.
त्यांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. कोरोनाच्या सुरुवातीला अनेक खाजगी रग्णालय अधिग्रहण करण्यासाठी आरोग्य विभागाला अडचणी आल्या. त्यामुळे ती जबाबदारी वाघमारे यांनी स्विकारुन खाजगी रुग्णालयात कोरोना रुग्णांना उपचार मिळावे यासाठी अधिग्रहण केली.

वाखरी (ता. पंढरपूर) येथील एमआयटी कोविड सेंटर येथे  महाराष्ट्रातील पहिली हायटेक ओपीडी सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्याचबरोबर लॉक डाउनमध्ये गोर-गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून आधार देण्याचे काम त्यांनी केले.

तसेच परप्रांतीय आणि बाहेर गावाचे नागरिक लॉकडाऊन मध्ये पंढरपूर येथे अडकले होते. ५०० हून परप्रांतीयांना स्थलांतरित करण्यासाठी रेल्वेची उपलब्धता त्याच्या प्रयन्तमुळे झाली.   त्यामुळे हजारो लोक त्यांच्या गावी लागले. अतिवृष्टी, महापूराचे अनुदान शेतकºयांना लवकर मिळण्यासाठी पाठपुरावा वाघमारे यांनी केला आहे.

वर्षांवर्षे सुरु असलेले अनेक वाद मिटवले

अनवली (ता. पंढरपूर) येथील महत्त्वाच्या रस्त्यावरुन नागरीकांमध्ये वाद सुरु होता. यामुळे मागील ४० वर्षापासून या रस्त्याचे काम प्रलंबीत होते. परंतु या दोन्ही बाजूची समजूत घालून हा वाद मिटवला. त्याचबरोबर अनवली येथे १५ वर्षापासून सुरु असलेला रस्त्याचा वाद तहसिलदार वाघमारे यांनी सोडवला आहे.