Home पंढरपूर जिल्ह्याधिकारी यांच्या नव्या आदेशानुसार पंढरपूरात पोलिसांची धडक कारवाई.

जिल्ह्याधिकारी यांच्या नव्या आदेशानुसार पंढरपूरात पोलिसांची धडक कारवाई.

1222
0

पंढरपूर :- सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी निर्गमित केलेल्या नव्या आदेशानुसार आज पंढरपूर मध्ये कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल 222 लोकांवर आज पंढरपुर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. पंढरपूर पोलिसांनी या कारवाईच्या माध्यमातून 67 हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला.

आज केलेल्या कारवाईमध्ये मास्क न वापरता फिरणारे १०३ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये दहा हजार तीनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर दुचाकी वाहनांवर मोकाट रीतीने फिरणाऱ्या 105 जणांवर कारवाई करून 52 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दुकानांमध्ये खरेदीसाठी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना प्रवेश दिल्याबद्दल 3 दुकानदारांवर कारवाई करून पंधराशे रुपयांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

दुचाकीवर ट्रिपल सीट फिरत चमकोगिरी करणाऱ्या दोन वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली यामध्ये एक हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
तर मावा गुटखा पान तंबाखू खाऊन सार्वजनिक ठिकाणी आपल्या व्यसनाच्या पिचकार्‍या मारणाऱ्या प्रत्येकी दोनशे रुपये प्रमाणे आठशे रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

पंढरपूर शहर तालुक्यात वाढत्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या आणि नागरिकांचा निष्काळजीपणा पाहता पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली.
त्यामुळे पंढरपूरकरांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व कारवाई टाळावी असे आवाहन पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.