Home पंढरपूर न्यायप्रविष्ट घटनेतील साक्षिदारास मारहाण करुन केले फॅक्चर तिघांवर गुन्हा..

न्यायप्रविष्ट घटनेतील साक्षिदारास मारहाण करुन केले फॅक्चर तिघांवर गुन्हा..

863
0

उपरी येथील घटना

पंढरपूर:- शेतजमीनीच्या वादा संदर्भात कोर्टात दाखल असलेल्या दाव्यात साक्षिदार का झाला असे म्हणत तिघांनी‌ मिळुन काठीने दोघा भावांना मारहाण केली. या मारहाणीत एक जणांचे हाड फॅक्चर झाले आहे. हि घटना‌ उपरी ता पंढरपूर येथे शनिवारी राञी अकरा वाजणेच्या सुमारास घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपरी येथील बालाजी नागणे व त्यांच्या भावांची शेतजमीन वहिवाटीस लगतचे शेतकरी भगवान नागणे, पांडुरंग नागणे व त्यांची मुले सचिन व सुहास यांनी दादागिरी करत शेतजमीन वहिवाटीस अडथळा निर्माण केला आहे. गावातील टॅक्टरचालक शेतजमीनीची मशागत करणेस आलेवर आरोपी दादागिरी करत टॅक्टरचालकास नांगरणी न करता परत पाठवत आहेत. यामुळे मागील तीन महिनेपासुन बालाजी नागणे यांची शेतजमिन पडीक आहे. याबाबत पंढरपूर न्यायालयात दावा दाखल केला असुन यामध्ये टॅकरचालक रणजित नागणे याचे अॅफिडेट कोर्टात सादर करण्यात आले आहे.


यामुळे चिडुन जावुन टॅक्टरचालक रणजित यास सचिन भगवान नागणे, सुहास पांडुरंग नागणे, दीपक एकनाथ नागणे यांनी मारहाण करीत मोबाईल फोडला. भांडणे सोडवण्यास आलेला भाऊ प्रताप यास देखील आरोपींनी गंभीर मारहाण करत फॅक्चर केले आहे. याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

७/१२ उतारेपैक्षा जास्त जमीन तरीही आरोपींची दादागिरी…..
सदर प्रकरणातील आरोपींच्या कब्जे वहिवाटीस सध्या त्यांचे ७/१२ उतारेपैक्षा जास्त जमीन आहे. हे भुमि अभिलेख कार्यालयाच्या मोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. तरीही आरोपींना मोजणी मान्य केली नाही. उलट दादागिरी करीत शेतजमीन वहिवाटीस अडथळा करीत असलेमुळे पोलीस कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.