Home पंढरपूर पंढरीत भाविकांना करावे लागत आहे गटार गंगेत स्नान. नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष.

पंढरीत भाविकांना करावे लागत आहे गटार गंगेत स्नान. नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष.

700
0

पंढरपूर :- कार्तिकी एकादशीसाठी पंढरीत चार लाख भाविक दाखल झाले आहेत. विठू दर्शनाची आस घेवून आलेला भाविक चंद्रभागेत पवित्र स्नान केल्याशिवाय विठुरायाचे दर्शन घेत नाही. मात्र चंद्रभागेतील हेच पवित्र स्नान भाविकांना गटार गंगेत करावे लागत आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी शहराच्या तुंबळेल्या ड्रेनिजचे घाण पाणी चंद्रभागेत मिसळत आहे.
उध्दव घाटावर ड्रेनिजचे पाणी चंद्रभागेत मिसळत आहे. याच पाण्यात भाविकांना स्नान करावे लागत आहे. ही गंभीर बाब प्रत्येक यात्रेला प्रशासना समोर मांडली जाते. आढावा बैठकीत यावर घमासान चर्चा होत असते. पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने मोगम उत्तर देवून वेळ मारली जाते. मात्र कोणतीच ठोस कारवाई होताना दिसत नाही.

शहरातील घाण या ड्रेनिजच्या माध्यमातून नदीत जात आहे. उध्दव घाटावर सर्वत्र या घाण पाण्याची दुर्गंधी पसरली आहे. याचा भाविकांसह स्थानिक रहिवाशांना देखिल त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाच्या या अक्षम्य हलगर्जीपणाचा कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण कोळी यांनी निषेध केला आहे. भाविकांना स्वच्छ, निर्मळ सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच हे गटार गंगेचे पाणी न रोखल्यास भविष्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे.