Home पंढरपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेष्ठ समाजसेवकांनी घेतली आमदार भारत भालकेंची भेट.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेष्ठ समाजसेवकांनी घेतली आमदार भारत भालकेंची भेट.

1302
0

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालकेंची आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील जेष्ठ समाजसेवकांनी भेट घेतली. आरपीआय गवई गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रामदास दादा सर्वगोड, संत शिरोमणी चोखामेळा देवस्थान ट्रस्टचे चिंतामणी दादा सर्वगोड, दौलत आप्पा सर्वगोड आणि अशोक सर्वगोड यांनी ही भेट घेतली. सध्याच्या सामाजिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.


पंढरपूरला २०१९ मध्ये महापूर आला होता. आज जवळपास दहा महिने झाले तरी पुराच्या अनुदानापासून डॉ. बाबासाहेब नगरमधील जवळपास २५ ते ३० कुटुंब वंचित आहेत. दहा महिन्यापासून तलाठी ते प्रांताधिकारी कार्यालयाचे उंबरठे झीजवुन झाले तरी कोणीच लक्ष न दिल्याने आज या जेष्ठ मंडळींनी आमदार भारत नाना भालकेंची भेट घेतली.

आ. भालकेंनी तात्काळ प्रांताधिकारी सचिन ढोले आणि तहसीलदार वैशाली वाघमारेंशी संपर्क साधून झालेल्या पंचनाम्यांचे अनुदान देण्याच्या सूचना दिल्या. दहा-दहा महिने नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत नाहीत. जेष्ठ नागरिकांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारालया लागणे ही बाब गंभीर आहे. यापुढे असे होवू नये अशा सक्त सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
तसेच यावेळी महार वतनाच्या जमिनीबाबत ही
आ.भालकेंसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महार वतनाच्या जमिनीबद्द्ल लॉकडाऊननंतर बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी या जेष्ठांना दिले. महार वतनाच्या जमिनीचा प्रश्न गेली अनेक वर्ष प्रलंबित आहे.
तसेच यावेळी अनेक सामाजिक विषयांवर चर्चा करण्यात आली. आ. भालकेंनी सर्व जेष्ठ मंडळीची आस्थेने चौकशी करुन यापुढे गरज असेलतरच समक्ष भेटायला या अन्यथा फोन करून काम सांगितले तरी चालेल. फोन वर देखिल काम होवून जाईल असा विश्वास दिला.