पंढरपूर:- भाजप पक्ष वाढीपासून ते राज्यात सत्ता सुंदरी प्राप्त करेपर्यंत सलग 40 वर्षे पक्षासोबत सावली सारखे राहणार्या जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी पंढरपुरात २०१४ च्या कार्तिकी एकादशीच्या महापूजे वेळी केलेले राजकीय वक्तव्य त्यांना भोवले होते. त्यांच्या त्या वक्तव्यानंतर सहा वर्षांनी त्यांना भाजप सोडून राष्ट्रवादीत काॅंग्रेस पक्षात प्रवेश करावा लागला आहे. खडसे यांचे बहुजन प्रेम त्यांना नडल्याची भावना आता व्यक्त होत आहे. समतेच्या पंढरीचे खडसे वारकरी आहेत. त्याच पंढरीतील त्यांचे वक्तव्य नडल्याची चर्चा आता होताहे.
राज्यात 2014 च्या निवडणूकीनंतर भाजप- शिवसेनेचे सरकार स्थापन झाले. स्व. गोपीनाथ मुंढे नंतर ज्येष्ठ म्हणून आपणास मुख्यमंत्रीपद मिळावे अशी त्यांची मनोमन इच्छा होती. परंतु भाजप प्रदेश अध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. तेव्हाच श्री. खडसे काहीसे नाराज झाले होते. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्याकडे महसूल, कृषी, उत्पादन शुल्क अशी महत्वाची सहा ते सात खाती देण्यात आली होती.
महसूलमंत्री पद असल्याने एकनाथ खडसेंना प्रथमच पंढरपूरच्या कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करण्याची संधी मिळाली होती.
खडसे कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधताना बहुजनाचा मुख्यमंत्री झाला असता तर मला आनंद झाला असता असे सूचक वक्तव्य करुन मुख्यमंत्री पद न मिळाल्याची खंत व्यक्त केली होती. त्यांच्या या वक्तव्यावरुन त्यावेळी भाजपात मोठी खळबळ उडाली होती.
त्या वेळचे वक्तव्य
श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा करण्याचा मिळाला याचा आनंद आहे . मात्र भाजपला बहुजन आणि ओबीसी समाजाने खूप मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा हि या इच्छा होती अशी इच्छा असणे गैर नाही असे सांगत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी एक प्रकारे आपल्या वर अन्याय झाला म्हणून आपली नाराजी व्यक्त केली.