माझ्या विरोधकांच्या पंक्तीत खालच्या जातीचे लोक जेवून जातात
एका बड्या संचालकाने चिंता व्यक्त करत मागासवर्गीयांबद्दल ओकली गरळ
पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यात सध्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. विठ्ठलचे चेअरमन अभिजीत आबा पाटील आणि सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या पॅनल मध्ये प्रमुख लढत होतं आहे. विचार विनिमय बैठका प्रचार सभांनी तालुका दणाणून गेलाय. गटनिहाय होत असलेल्या सभांसाठी मतदार सभासदांसाठी जेवणावळी देखील होतं आहेत.
विरोधी पॅनल प्रमुखाने दिलेल्या जेवणावळीत मतदानाचा हक्क नसणारे खालच्या जातींचे लोक जेवण करून जात आहेत. त्यांचा माझ्या विरोधकाला फायदा होणार नाही पण विचाराचा खर्च मात्र होतोय अशी खंत देखील त्याने व्यक्त केली. ( यावेळी या बहाद्दराने त्या जातींचा अपमान जनक उल्लेख केला ) एकीकडे या धनवान संचालकाचा नेता बसता उठता आपल्या भाषणामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतो. त्यांचे विचार सांगतो, त्यांनी दिलेल्या लोकशाहीनुसारच मी निवडणूक लढतोय असं ठासून सांगतो. आणि त्यांचा धनवान संचालक मात्र जातीयवाचक गरळ ओकून आपले तोंड काळे करताना दिसत आहेत.
गेल्या चार वर्षात समतेचा वारसा सांगणाऱ्या पंढरीत मागासवर्गीयांच्या डी एन ए पासून ते खालच्या जातीचे जेवून गेले इथपर्यंतचा प्रवास हा नक्कीच धक्कादायक आहे.