Home पंढरपूर पंढरपूरसह राज्यात 365 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार.

पंढरपूरसह राज्यात 365 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार.

458
0

मुंबईः- सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. कोर्टाच्या आधीच्या आदेशानुसार, 365 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर,मंगळवेढा,सांगोला,करमाळा अक्कलकोट,मैंदर्गी,दुधनी,कुर्डवाडीसह जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुका आता ओबीसी आरक्षणा विना होणार आहेत. इच्छुक ओबीसी उमेदवारांना हा मोठा धक्का आहे.