Home पंढरपूर पंढरपुरात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण

पंढरपुरात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे उपोषण

586
0

पंढरपूर :- जिल्हाधिकारी व न्यायालयाने हुकूमनाम्यामध्ये एक वादी व सहा प्रतिवादी असताना कुणाचा वाटप तक्ता तयार करण्याबाबत व नोंद देण्याबाबत आदेश केला होता. या आदेशाची नक्कल मिळावी या मागणीसाठी प्रांत कार्यालयातील टॉवरवर चढून कुबेर चिमाजी घाडगे मु. पो. देगाव ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. घाडगे यांचे टॉवरवर चढून हे तिसरे आंदोलन आहे.
सोमवारी सकाळीच शेतकरी टॉवरवर चालल्याने प्रशासनाची मात्र धावपळ उडाली आहे याठिकाणी पोलिस,तहसीलदार पोहोचले असून उपोषण करते चिमाजी घाडगे यांच्याशी उपोषण स्थगित करण्यासंदर्भात फोनद्वारे विनवणी सुरू आहे. शेतकरी कुबेर चिमाजी घाडगे हे जवळपास 100 फूट टॉवरवर चढले आहेत सोबत त्यांनी मोबाईल व पिशवी ठेवली आहे.