Home पंढरपूर वन विभागाने महिला मजुरांची एक महिन्याची मजुरी थकवली : मनसेचे आंदोलन

वन विभागाने महिला मजुरांची एक महिन्याची मजुरी थकवली : मनसेचे आंदोलन

233
0

सांगोला :- लोटेवाडी ते सोनलवाडी दुतर्फा वृक्ष लागवड खुरपणी काम करणार्‍या महिलांचा चार आठवड्यांचा पगार वन विभागाकडे वारंवार मागणी करूनही मिळाला नाही. या विरोधात मनसेच्या वतीने सांगोला तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

कष्टकरी महिलांना त्यांच्या हक्काचा पगार द्यावा आणि अन्याय करणाऱ्या वनपाल अधिकाऱयांना निलंबित करावे अशी मागणी करत धरणे आंदोलन सांगोला तहसील कार्यालयासमोर अक्षय विभुते यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
अखेर वनाधिकारी श्रीमती एम एम पाटील यांनी पंधरा दिवसात महिलांची मजुरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
28 फेब्रुवारी पर्यंत महिलांचा पगार न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.