Home महाराष्ट्र मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात सोलापूरचे काँग्रेस नेते गौरव खरात सह...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर भीषण अपघात सोलापूरचे काँग्रेस नेते गौरव खरात सह चार जण जागीच ठार .

906
0

मुबंई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झीट जवळ सहा वाहनांचा अपघातात चार ठार तर तीन किरकोळ जखमी.

मुंबई :- मुबंई पुणे एक्सप्रेस वर खोपोली हद्दीत बोरघाट उतरताना सहा वाहनांचा अपघात होऊन सोलापुर जिल्ह्यातील तिघे तरुण तर तुळजापुर येथील एक तरुण जागीच ठार तर जालना जिल्हातीन तिघे जण किरकोळ जखमी.मयतामध्ये काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष गौरव खरात यांचा समावेश आहे.

पहाटेच्या सुमारास एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झीट जवळ मुबंई कडे जाताना MH 46 AR 3877 या कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने कंटेनर ने पुढे जाणा-या MH13 BN 7122 या स्वीफ्ट कारला धडक दिली, (यातील चार प्रवासी मयत) स्वीफ्ट कार ने MH 10 AW 7611 या पुढे जणा-या आयशर टेम्पो धडक दिली, टेम्पो ने पुढे जाणा-या MH 21 BO 5281 या पुढील कारला जोरदार धडक दिली. (या कार मधील तीन प्रवासी रा. जालना किरकोळ जखमी). वेन्यु कार ने पुढे जाणा-या कंटेनर MH 46 BM 5254 जोरदार धडक दिली. मात्र या कंटेनर चालक मात्र निघुन गेला.

या अपघातात स्वीफ्ट कार मधील गौरव गौतम खरात, सौरभ तुळसे, सिद्धार्थ मल्लीक राजगुरु, जि. सोलापुर व मयुर दयानदं कदम रा. तुळजापुर हे जागीच ठार झाले तर पवन अग्रवाल, मितेश वडोदे, अस्लम शेख तिघे ही रा. जालना, वेन्यु कार मधील प्रवासी किरोळ जखमी आहे.

सदर अपघाताची माहीती कळताच आय आर बी यत्रंणा, महामार्ग वाहतुक पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स घटनास्थळी पोहचुन मदतकार्य सुरु करुन अपघातग्रस्त दोन कारचा अक्षरक्ष चक्काचुर झाला. या दोन्ही कार रस्त्याच्या बाजुला करुन दुर्तगती मार्ग मोकळा केला.

या अपघातात कंटेनर MH 46 AR 3877 चा ब्रेक फेल होऊन पुढील वाहनांना धडक देण्याची मालीका सुरु झाली. तर सर्वा पुढे असणारा म्हणजेच शेवटची धडक बसलेला कंटेनर MH 46 BM 5254 याला पाठिमागुन धडकलेल्या वाहनांची माहीती नसल्याने मुबंई कडे निघुन गेला.

सदर अपघातात लेन ची शिस्त व उताराची काळजी न घेतल्याने झाल्याची माहीती बचावलेला प्रवासी अस्लम शेख याने दिली. तर पुढील तपास खोपोली पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष कळसेकर करीत आहे.