Home पंढरपूर ते स्वतः कधी जनतेतून निवडून आले नाहीत मनसे नेते दिलीप धोत्रे...

ते स्वतः कधी जनतेतून निवडून आले नाहीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा प्रशांत परिचारकांना टोला. नगरपालिका निवडणूकी आधी आरोप प्रत्यारोपांना सुरवात.

408
0

पंढरपूर :- माजी आमदार प्रशांत परिचारक कधीच जनतेतून निवडून आले नाही. त्यांनी मला टोमणा मारू नये. कारण मी कधीच नगरपालिकेची निवडणूक लढली नाही.त्यामुळे परिचारकांचा अभ्यास कच्चा असल्याचा टोला मनसे नेते दिलीप धोत्रेंनी माजी आमदार प्रशांत परिचारकांना लगावला.
गुरुवारी एका आंदोलना दरम्यान नगरपालिका निवडणुकीवरून मनसे नेते दिलीप धोत्रेंवर टीका केली होती. त्याला आज धोत्रेंनी उत्तर दिले.
मी स्वकर्तुत्वाने राजकारणात मोठा झालोय. काकांच्या जीवावर कधीही राजकारण केले नाही. आपलं सगळं राजकारण काकांच्या जीवावर होते आणि आहे.
परीचाराकांच्या विरोधात कोणतीहि निवडणूक लढण्यास आपण तयार असल्याचे असे थेट आव्हान धोत्रेंनी दिले. स्वतः विधानसभेला पराभूत झाल्यानंतर परीचारकांनी स्वतः च्या वयोवृद्ध काकांना निवडणूकी उभे केले पण त्यांना निवडणूक आणू शकले नाही.
आमच्या संभाव्य आघाडीला जनतेतून मिळणाऱ्या पाठींब्या वरून परीचारकांच्या पायाखालची जमीन सरकली असल्याने ते अशी ढ विद्यार्थ्यांसारखी वक्तव्य करत आहेत.
नगरपालिकेचा चहा प्यायला नाही अशी बालिश वक्तव्य करणाऱ्या परीचारकांनी नाम संकीर्तन सभागृह, प्रधानमंत्री आवास योजना , एक कोटी वृक्ष लागवड अशा अनेक कामात भष्ट्राचार झाल्याची चर्चा शहरात आहे. नगरपालिकेची सत्ता मिळाली काय अन या मिळाली काय ? मला फरक पडत नाही असे परिचारक म्हणाले होते. तर त्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी आपल्या बगल बच्चनच विकास केला. अशी टीका धोत्रेंनी केली.
ग्रामीण भागात रस्त्याच्या अडचणी बाबत परिचारक आंदोलन करतात. त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याबद्दल त्यांनी एकदा आंदोलन करावे . राज्य सरकार विरोधात आंदोलनाची नाटकं करू नये.
या पत्रकार परिषदेला कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण भाऊ कोळी , विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, दत्ता भोसले, जयवंत भोसले, संतोष कवडे , गणेश पिंपळनेरकर आदी उपस्थित होते.