पंढरपूर :- मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे शेततळ्यात पडून एकाच कुटुंबातील तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी ४ ते ५ वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. शेततळ्याच्या शेजारी खेळत असताना तोल जावून तीन मुलं पाण्यात बुडाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कार्तिकेश हिंगमीरे, सिद्धार्थ निकम, विनायक निकम अशी मृतांची नावं आहेत. दरम्यान, निकम कुटुंबीय मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील डोंगरे शेतकऱ्याकडे काम करायचे. तर हिंगमीरे कुटुंबीय शेटफळ येथील रहिवासी होते.मयत मुले आत्या मामाची मुलं आहेत.