Home पंढरपूर डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अभिजीत पाटील यांना “आदर्श उद्योजक” पुरस्कार.

डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अभिजीत पाटील यांना “आदर्श उद्योजक” पुरस्कार.

117
0

पंढरपूर:- दैनिक नवभारत वृत्तपत्र समुहाच्या दैनिक नवराष्ट्रच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “आदर्श उद्योजक” हा पुरस्कार यंदा डीव्हीपी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.अभिजीत पाटील यांना प्रदान करण्यात आला आहे.

उद्योग सांभाळून अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक भान जपत युवकांना सकारात्मक कार्यासाठी संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
उद्योग क्षेत्रात त्यांनी मिळवलेल्या कौतुकास्पद आणि दैदिप्यमान यशाबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.

पुणे शहरातील एम.एम.जोशी सभागृह येथे हा समारंभ घेण्यात आला. राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री.दत्तात्रय भरणे साहेब यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार देण्यात आला असून त्याप्रसंगी पुण्याचे महापौर श्री.मुरलीधर मोहोळ, खा.श्री.गिरीश बापट, प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक श्री.युवराज ढमाले, श्री.श्रीनिवास रावू, पोलीस आयुक्त श्री.कृष्ण प्रकाश साहेब, नवराष्ट्र पत्रकार श्री.राजेशजी शिंदे आदींची उपस्थिती होती.