Home पंढरपूर उत्सव मुर्ती ठेवल्याशिवाय झीज थांबणे अशक्य, पुरातत्त्व विभागाचे मत – विठ्ठल जोशी

उत्सव मुर्ती ठेवल्याशिवाय झीज थांबणे अशक्य, पुरातत्त्व विभागाचे मत – विठ्ठल जोशी

181
0

पंढरपूर :- पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तीची झीज थांबवण्यासाठी मंगळवार आणि बुधवारी वज्रलेपन केले जाणार आहे. यापूर्वी तीन वेळा १९८८, २००५ आणि २०१२ साली मुर्ती संवर्धनासाठी वज्रलेपन करण्यात आले होते. मात्र कायमचा उपाय म्हणून उत्सव मुर्तीच वापरावी असा सल्ला पुरातत्त्व विभागाचा असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशींनी सोलापूर डेली शी बोलताना दिलीय.

लॉकडाऊनमुळे मंदिर दर्शनासाठी बंद आहे. याच काळात मंदिर समितीने वज्रलेपन करण्यासाठी परवानगी मागीतली होती. यावर ४ जून रोजी पुरातत्त्व विभागाने दिली. मंगळवार पासून दोन दिवस पुरातत्त्व विभागाचे उपाधिक्षक श्रीकांत मिश्रा हे मुर्तीस वज्रलेपन करणार आहेत.

मुर्तीचा कायमची झीज रोखण्यासाठी उपायोजन करणे गरजेच भाविकांची भावना आहे. मात्र त्यासाठी उत्सव मुर्तीच एकमेव पर्याय असल्याचे पुरातत्त्व विभागाचे मत आहे. सध्याच्या स्वंयभू मुर्तीला दिवसातून एकदा तरी दही, दूधाचा अभिषेक केला जातो. तसेच प्रत्येक भाविक पददर्शन घेत असल्याने देखिल मुर्तीची झीज होत आहे. वज्रलेपन म्हणजे रासायनिक लेपन केल्याने ही झीज थांबण्यास मदत होते. अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशींनी दिली.
मात्र या मुळ मुर्तीमध्ये भक्तांचा भावना गुंतल्या आहेत. भविष्यात मुर्तीची झीज रोखण्यासाठी मनावर दगड ठेवून निर्णय घेणे गरजेचे आहे.