Home महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून आगोती गाव होणार हरित

पत्रकार संघाच्या माध्यमातून आगोती गाव होणार हरित

108
0

इंदापूर (भीमसेन उबाळे) सिनेअभिनेते शिवकुमार गुणवरे यांच्या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून गावामध्ये १००० लागवडीचा प्रारंभ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका नीलकंठ मोहिते,पत्रकार संघाचे मुख्य सागर शिंदे,इंदापूर तालुका उपाध्यक्ष संदीप सुतार,यांच्या हस्ते करण्यात आला.

            यावेळी पत्रकार संघाचे इंदापूर तालुका अध्यक्ष नीलकंठ मोहिते मुख्य सचिव सागर शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.तंटामुक्ती अध्यक्ष रामदास घनवट,सामजिक कार्यकर्ते लक्ष्मण गुणवरे,सरपंच मोनाली दळवी, उपसरपंच सुनील शिंदे,ग्रामसेवक बालाजी निलेवाड, पोलीस पाटील रेश्मा गुणवरे, मुख्याध्यापक बालाजी कलवले, गावकरी ग्रामपंचायत सदस्य कौशल्य गुणवरे, सामजिक कार्यकर्ते विनोद दळवी,नंदकुमार भोसले, सुखदेव गुणवरे, दिलीप गुणवरे आदी उपस्थित होते. 

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सन्मान विजयकुमार परीट व पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी प्रज्ञा घोरपडे,क्षितीजा भोसले,ओंकार घोरपडे,सृष्टी विजयकुमार परीट यांना सन्मानित करण्यात आले.पत्रकार संघाचे कार्यकारणी सदस्य सुरेश मिसाळ,शिवाजी पवार,निखिल कणसे, भीमसेन उबाळे, प्रेस फोटोग्राफर राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.