Home पंढरपूर समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांची चौकशी : पैसे घेऊन आश्रमशाळा...

समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कैलास आढे यांची चौकशी : पैसे घेऊन आश्रमशाळा अनुदान वाटप केल्याचा आहे आरोप

443
0

सोलापूर :- सोलापूर जिल्ह्यातील आश्रमशाळांना बेकायदेशीरपणे अनुदान वाटप केले असून कार्यालयातील शिपाई किसन पाटील मार्फत कोट्यावधीतचा पैसा गोळा केला जात असल्याचा आरोप दीपक गवळी यांनी सोलापूर समाज कल्याण कार्यालयातील सहाय्यक आयुक्त कैलास आढे, पुणे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यावर केला होता.

या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी सोलापुरात युवक पॅंथरच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दीपक गवळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शुभम बंगाळे, आदित्य वाघमारे, विकास सोनवणे, विश्वास नागमोडे, मुकेश बनसोडे, तुकाराम भोसले, सागर गायकवाड यांच्यासह संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रकरणाची इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय विभागाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशी साठी नाशिक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर यांना चौकशी अधिकारी नेमण्यात आले आहे. प्रकरणाची चौकशी करून अहवाल 15 दिवसात सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या कार्यपद्धती वरून कायम वादग्रस्त सोलापूर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त आढे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.