Home पंढरपूर शिवसेनेला खिंडार ; सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे मुख्यमंत्री एकनाथ...

शिवसेनेला खिंडार ; सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गोटात सामील

454
0

पंढरपूर :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला गळती लागण्यास सुरुवात झाली असून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विभागाचे माजी उपजिल्हाप्रमुख महेश साठे यांनी शिंदे गोटात प्रवेश केला आहे.
ऐशी टक्के समाजकारण आणि वीस राजकारण ही शिवसेना प्रमुखांची शिकवण होती या विचारधारेला छेद देण्याचे काम वरिष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून होत असल्याने आपण ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करीत असल्याचे साठे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर साठे यांनी आज मुख्यमंत्री शिंदे यांचा जाहीरपणे सत्कार करुन आपला राजकीय निर्णय जाहीर केला.
साठे हे 2010 ते 12 या दरम्यान उपजिल्हाप्रमुख म्हणून काम पहात होते. स्थानिक राजकारणातील मतभेदाला कंटाळून साठे यांनी शिवसैनिक म्हणून काम करण्याची भूमिका घेतली होती.
साठे यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेत पक्ष श्रेष्ठीनी त्यांना 2022 मध्ये जिल्हा नियोजन मंडळावर सदस्य करण्याचा निर्णय घेतला होता मात्र स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या गटबाजीने उठाव केल्याने साठेंना पदापासून दूर ठेवण्यात आले होते.
पक्षार्गत या खेळीमुळे साठे नाराज होते या नाराजीचा मोकळी वाट करुन देत साठेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
साठे यांचे नेतृत्व मानणारा एक मोठा गट सोलापूर जिल्हयातील शिवसेनेत कार्यरत आहे हा संपूर्ण गटच मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीमागे जाणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील सेनेला पहिले आणि मोठे खिंडार पडले आहे.