Home पंढरपूर कृष्णा धोत्रे मृत्यू प्रकरण घटना घडल्यापासून एक जण गायब. बुधवारी कृष्णाचा...

कृष्णा धोत्रे मृत्यू प्रकरण घटना घडल्यापासून एक जण गायब. बुधवारी कृष्णाचा वाढदिवस असल्याने परिसरात हळहळ.

1021
0

पंढरपूर :- पंढरपूर शहरातील संत पेठ भागातील सहा वर्षाच्या चिमुकल्या कृष्णा धोत्रेचा मृतदेह संशयास्पदरीत्या बंद शौचालयात 23 जानेवारी रोजी मध्यरात्री आढळून आला. या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ माजली. कृष्णाच्या नरड्या पासून कमरेपर्यंतचा पोटाचा भाग अक्षरशः रिकामा केला होता. पोटातील एकही अवयव शिल्लक नसलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला होता. ही घटना घडल्यानंतर एकजण गायब असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनेक जणांची चौकशी सुरु केली आहे.

ही हत्या आहे की जनावरांनी केलेला हल्ला आहे? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पंढरपूर पोलीस हत्या झाल्याच्या निकषानेच या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.
दरम्यान मंगळवारी सकाळी कृष्णाच्या आई-वडिलांनी माजी नगराध्यक्ष वामन तात्या बंदपट्टे, मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्यासह शेकडो नागरिक घेऊ पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम , पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांची भेट घेतली. कृष्णाची हत्याच झाली असून कृष्णाच्या मृत्यूचा सखोल तपास व्हावा. आणि दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली. आमच्या मुलाबाबत जे घडले ते इतरांच्या लेकरांबाबत घडू नये यासाठी पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.
घटना घडलेल्या दिवशी कृष्णाचे वडील तेव्हा धोत्रे यांनी कृष्णाचा शोध घेत असताना तीन वेळा बंद शौचालयामध्ये पाहणी केली. मात्र त्यावेळी त्याचा मृतदेह दिसून आला नाही. मात्र रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान कृष्णाचा मृतदेह दिसून आल्याची माहिती तीम्मा धोत्रे यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
सदरचा तपास पोलीस उपाधीक्षक विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.