Home पंढरपूर 25 वर्षाचा विठ्ठल परिवार संपवण्याची सुपारी विरुद्ध पॅनलच्या नेतेमंडळींनी घेतली –...

25 वर्षाचा विठ्ठल परिवार संपवण्याची सुपारी विरुद्ध पॅनलच्या नेतेमंडळींनी घेतली – समाधान काळे

216
0

पंढरपूर :- 25 वर्षापासून विठ्ठल परिवार पंढरपूर तालुक्यात एकसंघ आहे. गेल्या दीड वर्षापासून परिवारातील असंतुष्ट मंडळीने विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतली आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत विठ्ठल परिवारातील असंतुष्ट मंडळीनी मंगळवेढ्याच्या उदयोगपतीकडून पैसे घेऊन विठ्ठल परिवारामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतली आहे. श्री विठ्ठल कारखान्याच्या 1060 सभासदांचे उस बिलाचे पैसे देणे बाकी असताना 25 हजार सभासदांचे उस बिल देणे बाकी असल्याचा अपप्रचार विरोधक करीत आहेत. याबाबत श्री विठ्ठल कारखान्याचे चेअरमन श्री भगीरथ भालके हे भूमिका मांडत असताना मात्र विरोधकांनी गावातील काही सभासदांना पुढे करून उस बिल प्रश्नासंदर्भात प्रश्न विचारून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून मीडियाला देउन चुकीचा प्रचार करीत आहेत. सहकार शिरोमणी साखर कारखान्या संदर्भात अडचणींवर मात करून काही शेतकऱ्यांना उस बिलापोटी ॲडव्हान्स् देण्याचे काम केले आहे. त्याच मार्गाचा वापर करून चेअरमर श्री भगीरथदादा हे पैसे उपलब्ध करून उस बिल देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे श्री समाधान काळे यांनी सांगितले.

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारा दरम्यान युवा नेते संचालक श्री समाधन काळे हे बोलत होते.

यावेळी दोनही कारखान्याचे आजी-माजी संचालक सर्वश्री राजेंद्र शिंदे विजयसिंह देशमुख, तानाजी सरदार, गोकुळ जाधव, शिवाजी आसबे, शहाजी साळुंखे, अण्णा शिंदे, तानाजी कांबळे, उदय पवार, योगेश ताड, शालिवाहन कोळेकर, भास्कर मोरे, बापू ताड, बाळासाहेब ताड, बिबीशन जाधव, बाबासाहेब जाधव, नारायण शिंदे, अण्णा ताड, हनुमंत दांडगे, औदुंबर घाडगे, मेजर घाडगे यांचेसह श्री विठ्ठल कारखान्याचे सभासद कार्यकर्ते उपस्थित होते.