पंढरपूर :- भीमा सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी मतदान पार पडलं. भाजपचे खासदार आणि कारखान्याचे विद्यमान चेअरमन धनंजय महाडिक विरुद्ध भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत झाली. आज सकाळपासूनच सोलापुरात मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीतील मतमोजणीनंतर महाडिक गट 3 हजार 577 मतांनी आघाडीवर आहे. यानंतर महाडिक गटात एकच जल्लोष सुरू झाला आहे. तर परिचारक पाटील गटाने हा पराभव मान्य केला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत कारखान्याच्या सभासदांचे आभार मानले आहेत.
“खोटं बोलून जिंकण्यापेक्षा खरं बोलून पराभव झालेला कधीही चांगला” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे. त्यांच्या या पोस्टमुळे पहिल्या फेरीच्या मतमोजणीनंतरच परिचारक-पाटील गटाने आपला पराभव मान्य केल्याचे सिद्ध झाले आहे.