Home पंढरपूर महाविकास आघाडी सरकार मुळे मराठा आरक्षण लटकले – अखिल भारतीय मराठा महासंघाचे...

महाविकास आघाडी सरकार मुळे मराठा आरक्षण लटकले – अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांचा आरोप.

229
0

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राजेंद्र कोंढरे यांची निवड
मराठा महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यकारणीची निवड

पंढरपूर :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात न्यायालयामध्ये चुकीच्या पध्दतीने मांडण केल्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रखडले आहे,असा थेट आरोप अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंडरे यांनी केला आहे. अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी महाविकास आघाडीवर निशाना साधला आहे.
निवडीनंतर बोलताना श्री.कोंडरे म्हणाले की, 2018 मध्ये मराठा समाजाला एसईबीसी आरक्षण मिळाले होते. दरम्यान उच्च न्यायालयाने मंजूर केलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक मागासलेपण सर्वोच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले नाही. उलट त्यांच्या काळात साखर सम्राट, शिक्षण सम्राट,आमदार, खासदार अशी समाजाची प्रतिमा तयार केली.महाविकास
आघाडीच्या चुकीच्या मांडणीमुळेच मराठा समाजाचे आरक्षण रखडल्याचा आरोप श्री. कोंडरे यांनी केला.मराठा समाजाला न्यायालयाच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण द्यायचे असेल तर सध्याच्या शिंदे -फडणवीस सरकारने समाजाचा सखोल अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करावी अशाही मागणीही त्यांनी
केली.

पंढरपूर येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
राजेंद्र कोंढरे यांची तर उपाध्यक्षपदी अण्णासाहेब आर्थिक विकास
महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांची सर्वानुमते बिनविरोध निवड
करण्यात आली.
रविवारी (ता.29) पंढरपूर येथील संत तनपुरे महाराज मठात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. त्यामध्ये सभेला राज्यभरातून उपस्थितीत असलेल्या मराठा महासंघाच्या सदस्यांनी एक मतांनी अध्यक्षपदी श्री.कोंढर व उपाध्यक्षपदी श्री.पाटील यांची निवड केली. दरम्यान तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने न्यायालयात केलेल्या चुकीच्या मांडणीमुळे मराठा समाजाचे आरक्षण रखडल्याचा आरोप श्री.कोंडरे यांनी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकारणी निवडीला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महासंघाच्या राष्ट्रीय
कार्यकारणीची सर्वसाधारण सभा घेवून राष्ट्रीय कार्यकारणीची निवड जाहीर केली.निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. प्रवीण गोगावले यांच्या उपस्थितीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
सरचिटणीसपदी प्रकाश वसंतराव देशमुख, कोषाध्यक्षपदी प्रमोद बळवंत जाधव,चिटणीसपदी अतिश गायकवाड यांची निवड करण्यात आली. मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष अर्जून चव्हाण यांच्या हस्ते राजेंद्र कोंडरेसह नुतन पदाधिकार्यांचा सत्कार करण्यात आला.

पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर होताच, मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांनी फटक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. सभेला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या महिला अध्यक्षा भारतीताई पाटील, वसंतराव मुळीक,विनायक पवार,सोलापूर जिल्हा अध्यक्ष अर्जूनराव चव्हाण, तालुका अध्यक्ष संतोष जाधव, माळशिरस तालुका अध्यक्ष शामराव गायकवाड, सांगोला तालुका अध्यक्ष रोहित शिंदे, सचिन डोरले, पंढरपूर शहर अध्यक्ष अमोल पवार, नागेश गायकवाड, गुरुदास गुठाळ, काका यादव,नागेश गायकवाड, सचिन थिटे,संदीप गोरे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा प्रभावती गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष सचिन गंगथडे,आण्णा आमने, अर्चना चव्हाण,अश्विनी साळुंखे आदींसह पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.