Home पंढरपूर आमदार भारत नाना भालकेंचा कोरोनाला हाबडा ; बुक्कीत दात पाडून झाले...

आमदार भारत नाना भालकेंचा कोरोनाला हाबडा ; बुक्कीत दात पाडून झाले कोरोनामुक्त.

2902
0

पंढरपूर :- पंढरपूर-मंगळवेढ्याचे पैलवान आमदार भारत नाना भालके यांनी कोरोनाला हाबडा दिलाय. कोरोना व्हायरसचे बुक्कीत दात पाडून आमदार भारत नाना भालके कोरोनामुक्त झालेत.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामात संचालक , अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर आमदार भारत नाना भालके यांनी देखिल कोरोना टेस्ट करुन घेतली होती. यामध्ये ते पॉझिटिव्ह आढळून आले. दक्षता म्हणून पुढील उपचारासाठी ते पुण्याच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अवघ्या सहाच दिवसांमध्ये पैलवान आमदार भारत नाना भालके यांनी कोरोना हाबडा दिलाय. आज बुधवारी सकाळीच्या कोरोना सोडून सर्व चाचण्या सकारात्मक आल्या आहेत. त्यामुळे आमदार भारत भालके पुन्हा एकदा जॉईट किलर ठरले आहेत.
आपल्या राजकीय जीवनात त्यांनी जनता जनार्दनाच्या पाठिंब्यावर अनेक प्रतिस्पर्ध्यांना हाबडा दिला. त्यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मतदारसंघासह राज्यातील सर्वधर्मीय भालके प्रेमींनी त्यांच्या कोरोनामुक्तीसाठी देवाला साकडे घातले. अखेर जनतेच्या कृपाशीर्वादाने आमदार भारत भालके कोरोनामुक्त झाले आहेत. लवकरच नव्या जोमाने ते जनसेवेसाठी मैदानात येतील.