Home ताज्या बातम्या काठी अन घोंगडं घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूकीच्या मैदानात.

काठी अन घोंगडं घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूकीच्या मैदानात.

2016
0

पंढरपूर :- राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे वारे वारे वाहू लागलेत. मुंबई महानगरपालिकेची देखील तयारी सुरू झालीय.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज मनसे पदाधिकाऱयांची बैठक घेतली. तसेच माळशिरस नगरपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या रेश्मा टेळे यांच्यासह अनेक नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते राज ठाकरे यांचा काठी आणि घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. आता हातात काठी घेऊनच राज ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

मुंबई येथील एमआयजी क्लब येथे झालेल्या कार्यक्रमावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष अप्पा करचे, आकाश व्होनमाणे ,पप्पू तरंगे ,नदीम मुलानी,इत्यादी उपस्थित होते.