Home पंढरपूर जोरदार तयारीला लागा निवडणुकीत आपली ताकद दाखवा राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; दिलीप...

जोरदार तयारीला लागा निवडणुकीत आपली ताकद दाखवा राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; दिलीप धोत्रे यांनी दिला सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा.

349
0

मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेते आणि सरचिटणीस यांची मंगळवारी एम आय जी क्लब बांद्रा येथे बैठक आयोजित करण्यात आली, या बैठकीत आगामी
जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपालिका व महापालिकेच्या निवडणुका आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. ह्या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद दिसली पाहिजे यासाठी आता पासूनच जोरदार तयारीला लागा असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकांच्या पाश्वभूमीवर आदेश दिले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुर विधानसभा पोटनिवडणुक तसेच आगामी महापालिका आणि 11 नगरपालिका निवडणुकीत मनसे आपली ताकत लावणार आहे. याबद्दलचा संपूर्ण आढावा राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी पक्ष प्रमुख राज ठाकरे यांना दिला.

यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर,नेते अमित ठाकरे, नेते अविनाश अभ्यंकर, नेते नितीन सरदेसाई,नेते आमदार राजू दादा पाटील,नेते अभिजित पानसे,नेते शिरीष सावंत, नेते अनिल शिदोरे,नेते दीपक पायगुडे, नेते बाबू वागस्कर,नेते जयप्रकाश बाविस्कर, नेते संजय चित्रे,महिला नेत्या शालिनीताई ठाकरे, महिला नेत्या रिताटाई गुप्ता, यांच्या सह सर्व सरचिटणीस पदाधिकारी उपस्थित होते,,तसेच प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे, जिल्हा अध्यक्ष विनायक महिंद्रकर,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहर अध्यक्ष जाईनुद्दीन शेख ,विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अमर कुलकर्णी उपस्थित होते,दरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले,