Home पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात मनसेची ग्रामपंचायत निवडणूकीत धमाकेदार एन्ट्री; राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी...

सोलापूर जिल्ह्यात मनसेची ग्रामपंचायत निवडणूकीत धमाकेदार एन्ट्री; राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी केला नूतन सदस्यांचा सत्कार .

375
0

पंढरपुर :- सोलापूर जिल्ह्यातील बुद्रुकवाडी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव निलेश भोसले यांनी आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांनी 7 पैकी 5 जागेवर विजय मिळवलाय. यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीत मनसेची धमाकेदार एन्ट्री झालीय. जिल्ह्यात अनेक ग्रामपंचायतीमध्ये मनसेचे शिलेदार निवडून गेलेत. या सर्व विजयी उमेदवारांचा सत्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस दिलीपबापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील बुद्रुकवाडी , बासलेगाव ,मातनाळी , किरनली, हिप्परगा ,फुलचिंचोली ,शिंदेवाडी तावशी, हिवरे, सिध्देवादी, नराळे, लोटेवाडी आदी ग्रामपंचायतींवर मनसेचे पदाधिकारी निवडून आले आहेत.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आदेश दिल्यानंतरच्या अल्पावधीतच मनसेने हे मोठे यश संपादन केले आहे. आता गावाच्या कारभारावर मनसैनिकांच्या तिसऱ्या डोळ्यांची करडी नजर असणार आहे. गावच्या विकासासाठी आमचे सदस्य सदैव तत्पर असतील. गावाचा विकास हाच मनसेचा ध्यास असे सांगत दिलीप धोत्रे यांनी नूतन सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे, राहुल सुर्वे, दाजी शिंदे, बुद्रुकवाडी मनसे शाखा अध्यक्ष संतोष गुंड पाटील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.