Home पंढरपूर नगरपालिका, महानगर पालिका , जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यात...

नगरपालिका, महानगर पालिका , जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा- सुप्रीम कोर्टाचे आदेश

254
0

नवी दिल्ली: ओबीसी आरक्षणावर आज अंतिम सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा दोन आठवड्यात जाहीर करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालायने दिले आहेत. त्यामुळे राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे. ओबीसी समाजाचा इंम्पिरीकल टाडा तयार करण्यास वेळ मिळावा म्हणून राज्य सरकारने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आजच्या निर्णयाने राज्य सरकारला धक्का बसला आहे.