Home क्राईम पंढरपूर शहरात दहा वर्षाच्या मुलाचा खून ?

पंढरपूर शहरात दहा वर्षाच्या मुलाचा खून ?

1794
0

पंढरपूर :- शहरातील महात्मा फुले चौकात कृष्णा तीम्मा धोत्रे या दहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह सार्वजनिक शौचालया जवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रात्री सात ते आठच्या दरम्यान कृष्णा घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधा शोध सुरू केली. मात्र मध्यरात्री 12 च्या दरम्यान गेली अनेक वर्ष बंदावस्थेत असलेल्या शौचालय जवळ छीन्नविछीन्न अवस्थेमध्ये कृष्णाचा मृतदेह आढळून आला. कृष्णाची छाती पूर्णपणे फाडल्याचे दिसून आले. आपल्या लहानग्याचा मृतदेह पाहून नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला. तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करण्यात आला आहे. पोस्टमार्टम अहवालानंतरच मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. या घटनेने पंढरपूर शहरात एकच खळबळ माजली आहे. आपल्या मुलाचा खूनच झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत अधिक तपास पंढरपूर शहर पोलीस करत आहेत.