Home पंढरपूर ना.अजित पवार यांच्या मातोश्रींची नागेश फाटे यांच्या निवासस्थानी भेट

ना.अजित पवार यांच्या मातोश्रींची नागेश फाटे यांच्या निवासस्थानी भेट

302
0

पंढरपूर :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना.अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई अनंतराव पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांच्या गादेगाव येथील निवासस्थानी आवर्जुन भेट दिली.
मातोश्री अशाताई पवार या पंढरीत विठ्ठल रूक्मिणीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी नागेश फाटे यांच्या निवासस्थानी जावून पाहुणचार स्विकारला.
याबाबत प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी ही सदिच्छा भेट म्हणजे मी करीत असलेल्या कार्याबाबत मिळालेली शाबासकीची थाप आहे असे सांगितले. त्यामुळे आईसाहेबांनी दिलेला आशिर्वाद हा कायम स्वरूपी आशिर्वादरूपी राहिल. त्यांनी दिलेल्या बळावरती दिनदुबळ्यांच्या आडचणी सोडविण्याची प्रेरणा मला नक्की मिळेल असेही फाटे यांनी सांगितले.
या भेटी प्रसंगी अतुल गोसावी, दत्तात्रय पवार, हणुमंत पवार , राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेश सचिव कल्याण कुसूमडे, उद्योगपती डॉ.रमेश फाटे , उमेश फाटे ,
तालुकाध्यक्ष उमेश सासवडकर , अशोक फाटे ,प्रकाश फाटे ,गणेश बागल ,शांतिनाथ बागल ,सतिश बागल ,प्रताप टेलर,औदुंबर माने,गणेश बागल,ओंकार फाटे,शुभम फाटे ,संकेत फाटे ,शशांक फाटे ,यांच्यासह गादेगाव येथील अनेक मान्यवर उपस्थित होते.