पंढरपूर :- येथील निवृत्त नायब तहसीलदार दत्तात्रय चांडोले (रा. विजापूर गल्ली ) यांचा एकुलता एक मुलगा निखिल चांडोले ( वय 24 ) याने प्रेम प्रकरणातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांना सापडलेल्या चिठ्ठी मध्ये त्याने ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहून ठेवले आहेत.
निखिल हा पैठण येथे शिक्षण आणि नोकरी करीत होता. रविवारी दिवसपाळी करून तो रूम वर आला होता. मध्यरात्री त्याने रूम मधील पंख्याला गळफास घेतला. सकाळी त्याचा मित्र रूम वर आल्यावर त्याला ही घटना समजली.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्याच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तर प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. निखिल इंजिनियरिंगचे शिक्षण घेत होता. त्याला पैठण एमआयडीसी येथील एका कंपनीत इंजिनिअर या पदावर नोकरी लागली होती. त्यामुळे सध्या तो पिंपळवाडी येथील आदर्शनगरमध्ये राहत होता.
अनेक चिठ्ठ्या आढळून आल्या
एका प्रेमपत्रात ”तेरे बिन नहीं जीना मर जाना ढोलना” असे हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल लिहिण्यात आले आहेत. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच नातेवाईक आल्यानंतर या युवकाने आत्महत्या का केली ? कुठल्या युवतीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते का ? या प्रश्नाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.