Home पंढरपूर विठ्ठल मंदिरानंतर आता पंढरपुरातील चारशे मठ,धर्मशाळा दोन महिन्यांसाठी लाॅकडाऊन.

विठ्ठल मंदिरानंतर आता पंढरपुरातील चारशे मठ,धर्मशाळा दोन महिन्यांसाठी लाॅकडाऊन.

1483
0

 

पंढरपूर:- आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून काही वारकरी भाविक पंढरपुरात येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नगरपालिकेने खबरदारी म्हणून पंढरपूर व परिसरातील जवळपास चारशे हून अधिक  मठ,धर्मशाळापुढचे दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. पाालिकेेने सर्व मठांच्या व्यवस्थापकांना तशा लेखी नोटीसा ही दिल्या आहेत,अशी माहिती  पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेच्या वतीने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. यामध्ये नागरिकांचे थर्मल स्क्रिनिंग, पल्स आक्सीमीटर घेणे, शासकीय कार्यालयांचे निर्जंतुकीकरण करणे, शहरातील स्वच्छता राखणे, व्यवसायिकांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांना सोशल डिस्टन्सींग विषयी माहिती देणे आदींचा समावेश आहे.

विविध प्रतिबंधात्मक उपाय योजना करुनही शहरात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आल्याने प्रशासन हादरुन गेले आहे. त्यानंतर बाधीत भागातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

अशातच निर्जला एकादशीच्या दिवशी राज्याच्या अनेक भागातून काही वारकरी पंढरपुरात आले होते. ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने संबंधीत वारकर्यांवर कारवाई करण्यात आली.

एक जुलै रोजी आषाढी वारी आहे.  राज्य सरकारने पालखी सोहळा रद्द केला असला तरी अनेक भाविक एकादशी दिवशी किंवा त्यापूर्वी शहर व परिसरातील मठांमध्ये येण्याची शक्यता आहे. बाहेरगावाहून वारकरी मठामध्ये आले तर पंढरपुरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे आहे. 

ही गंभीर बाब म्हणून पालिकेने पालिकेने शहर व परिसरातील सुमारे साडेतीनशे ते चारशे मठ बंद करण्याचे आदेश दिले आहेत. मठांमध्ये नव्याने कोणालाही प्रवेश देवू नये, दिल्यास संबंधीत मठांवर कारवाई केली जाईल असा इशाराही पालिकेच्या वतीने देण्यात आला आहे.

आज नगरपालिकेच्या पालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांनीही शहर व परिसरातील काही मठांना भेटी देवून मठांच्या व्यवस्थापकांना सूचना दिल्या.

“आषाढी एकादशीच्या पूर्वी काही भाविक विविध मठांमध्ये येण्याची शक्यता आहे.त्यामुळे पालिकेने खबरदारी म्हणून आता पासूनच बाहेर गावाहून येणार्या भाविकांना प्रतिबंध करण्यात आला आहे. मठांच्या व्यवस्थापकांनी पुढचे दोन महिने कोणालाही मठात प्रवेश देवूनये. मठांमध्ये बाहेरील लोक दिसून आल्यास संबंधीत मठाच्या व्यवस्थापकांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.”
साधना भोसले (नगराध्यक्ष पंढरपूर)