Home पंढरपूर पंढरीत एका सहकारी बॅंकेचा कॅशियर आणि सी ए कोरोना बाधित.

पंढरीत एका सहकारी बॅंकेचा कॅशियर आणि सी ए कोरोना बाधित.

2425
0

पंढरपूर:- पंढरपूर शहरांमध्ये आज एका खाजगी सहकारी बँकेचा कॅशियर आणि एक चार्टर्ड अकाउंटंट यांना कोरोनाची बाधा झालीय.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाजारपेठेमध्ये असलेल्या एका सहकारी बँकेचा कॅशियर आज कोरोना बाधित आढळून आलाय. तर स ज्येष्ठ चार्टर्ड अकाउंटंट यांचा देखील कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय. यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आल्याचे समजते.
पंढरपूर शहर आणि तालुक्यांमध्ये कोरोना आता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना देखील होत असल्याने ही साखळी वाढत जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्यानंतर आज एका सहकारी बँकेचा कॅशियर कोरोना बाधित आढळून आलाय. त्यामुळे या कॅशियरच्या संपर्कात आलेल्या बँकेमधील खातेदारांनी स्वतःहून पुढे येऊन आपली कोरोनाची चाचणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

आज शनिवारी 1 आँगस्ट रोजी शहरात 27 तर ग्रामीण भागात 8 रूग्ण वाढले आहेत. आजच्या अहवालानुसार उपचारा दरम्यान 1जण मरण पावले आहेत. पंढरपूरची एकूण संख्या ५४१ वर पोहचलीय.

कोरोनामुळे आजवर मयत झालेल्यांची संख्या 16 झाली आहे.ग्रामीणमध्ये आज आढीव 1 , कोर्टी 1, लक्ष्मी टाकळी 1, मुंढेवाडी 1 , कासेगाव 2 , शिरगाव 2 रुग्ण आढळले आहेत.

पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी सतर्क आणि सुरक्षित राहावे. यासाठी सोलापूर डेलीच्या वतीने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्यास माहितीसाठी हे असे सविस्तर वृत्त देण्यात येत आहे