Home पंढरपूर पंढरीत नामांकित सहकारी बॅंकेच्या अधिकाऱ्याने महिला खातेदारांना केले अश्लील मेसेज; महिलांनी दिला...

पंढरीत नामांकित सहकारी बॅंकेच्या अधिकाऱ्याने महिला खातेदारांना केले अश्लील मेसेज; महिलांनी दिला चोप . बॅंक काय कारणार याकडे सर्वांचे लक्ष.

2620
0

पंढरपूर
बॅंकेत सोनेतारण कर्जासह इतर कामांसाठी येणार महिला खातेदारांचे मोबाईल नंबर घेवुन बॅंकेचा एक अधिकारी त्यांना अश्लील मेसेज पाठवत असल्याचा गंभीर प्रकार पंढरपूरातील एका मोठ्या सहकारी बॅंकेत उघडकीस आलाय.
याबद्दल अधिकृत सुत्र आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार पंढरपूरातील एका मोठ्या सहकारी बॅंकेत शनिवारी २० जून रोजी ही घटना घडली आहे. या बॅंकेची रेल्वे रुळाच्या वरच्या भागात एक शाखा आहे. या शाखेत हा बॅंकेचा लाडका अधिकारी सोनेतारण कर्जाचा प्रमुख आहे. संसाराचा गाडा हाकताना आर्थिक अडचणी आल्या की बॅंकेत सोनेतारण ठेवून कर्ज काढण्यासाठी महिलांच जास्त प्रमाणात येतात. याचाच फायदा हा बॅंकेचा अधिकारी घेत होता. सोने ठेवुन कर्ज काढण्यासाठी येणाऱ्या महिलांचे हा असंतोषी अधिकारी मोबाईल नंबर घ्यायचा. अथवा सोने तारण अर्जावरचा नंबर घेवून हा रात्री अपरात्री त्या महिलांना व्हॉट्सअप वर अश्लील मेसेज करत असे. गेली अनेक दिवस हा प्रकार सुरु होता.


आजपर्यंत या असंतोषाने जवळपास १९ ते २० महिलांना त्रास दिल्याचे समजते. यातील काही महिलांनी त्याला चोप देखिल दिला आहे. मात्र बॅंकेच्या संचालकाचा नातेवाईक म्हणून याच्याकडे दुर्लक्षकरण्यात आले . त्याचा टेबल देखिल बदलण्याचे धाडस बॅंकेने केले नाही . आपले कोणच वाकडे करु शकत नसल्याची जाणीव झाल्यावर याचे धाडस वाढतच गेले. अखेर दहा दिवसांपासून अशाच एका महिलेला याने मेसेज केला. पहिले एक- दोन मेसेज चुकून पडल्याचे सांगून त्याने वेळ मारून नेली. मात्र हे चुकून नाहीतर मुद्दाम होत असल्याचे त्या महिलेच्या लक्षात आल्यानंतर या महिलेने या मजनूला बॅंकेत आणि बॅंकेच्या बाहेर “सरगम” म्हणत चौकात धुतला.
बॅंकेने पुन्हा हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या महिलेने कारवाईची मागणी केल्याने अखेर कागदावर त्याचा राजीनामा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली .

राजीनामा आणि या नाजूक प्रकरणावर चर्चा करण्यासाठी बॅंकेची विशेष बैठक

वारंवार हे प्रकार घडत आहेत. अनेक महिलांना तक्रारी करून देखिल या अधिकाऱ्यावर कारवाई का झाली नाही? अशा घटनांमुळे बॅंकेच्या नावाला काळीमा लागेल या भीतीने बॅंकेने विशेष बैठकीचे आयोजन केले आहे . यामध्ये या असंतोषी अधिकाऱ्याच्या राजीनाम्यावर चर्चा केली जाणार आहे. या बैठकीत राजीनामा मंजूर केली जाण्याची शक्यता आहे.