Home पंढरपूर पंढरपूरच्या कोरोना बाधितांची पाचशे कडे वाटचाल . आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील...

पंढरपूरच्या कोरोना बाधितांची पाचशे कडे वाटचाल . आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमधील एकासह तीन मृत्यू.

899
0

पंढरपूर:- पंढरपूर शहरामध्ये २४ तासात ६१ नव्या कोरुना बाधित रुग्णांची भर पडली. पंढरपूर तालुक्याचे रुग्ण संख्या आता ४२० वर पोहोचलीय. पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत कोरोना बाधित सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज भाजपाचे शहराध्यक्ष व दैनिक निर्भिड आपलं मतचे संपादक संजय वाईकर यांचा कोरोनामुळे सोलापुरात उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथिल ६५ वर्षीय पुरुष आणि घोंगडे गल्लीतील एका ७५ वर्षीय पुरुषाचा २२ जुलै रोजी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये आजपर्यंत एकही कोरोना बाधित रुग्ण आढळून आला नाही. मात्र आजच्या कोरोना अहवालामध्ये आंबेडकर नगर मधील एकाचा मृत्यू अशी माहिती देण्यात आल्याने आंबेडकर नगर मध्ये एकच खळबळ उडाली. हा मयत व्यक्ती कोण आहे? याची चर्चा सर्वत्र सुरु झालीय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर मधील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

पंढरपूर शहरांमध्ये आज सापडलेले ६१ रुग्ण हे गांधी रोड परिसरातील 1 , आयडीबीआय बँक खवा बाजार 1, तानाजी चौक 6 , विजापुरे गल्ली 3 , लक्ष्मीनारायण चौक 1 , गोविंदपुरा 7 , जुनी पेठ 1, घोंगडी गल्ली 1 , हनुमान मैदान 3 , भजनदास चौक 1 , सनगर गल्ली 4 , दत्त घाट 1 , इसबावी 2 , गवंडी गल्ली 2 , अनिल नगर 2 , भोसले चौक 1, महाद्वार 1 , फडे हॉस्पिटल संतपेठ 1 , रेल्वे कॉलनी 1 , कोळी गल्ली 2 , सावतामाळी मठ 1 , रोहिदास चौक 1 , बडवे चर 1 , नेपतगाव , करोळे प्रत्येकी 1 असे रुग्ण आढळून आलेले आहेत.

पंढरपूर मध्ये 147 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे तर सहा जणांचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर शहरामध्ये 266 सक्रिय कोरोना बाधित रुग्ण विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
पंढरपूरची कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे आता पंढरपूरकरांनी प्रशासनाच्या नियमांचे कडक पालन करीत, स्वयंशिस्त हि पाळावी आणि कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.