Home पंढरपूर पंढरी कोरोनाचा विस्फोट; तब्बल२६१ रुग्णांची वाढ.

पंढरी कोरोनाचा विस्फोट; तब्बल२६१ रुग्णांची वाढ.

1420
0

पंढरपूर:- पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागांमध्ये आज तब्बल 261 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली. मंगळवारी मध्यरात्री 12 पर्यंतच्या अहवालानुसार पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागामध्ये 136 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. तर आज पंढरपूर शहरांमध्ये घेतलेल्या रॅपिड एंटीजेन टेस्ट मध्ये तब्बल 125 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे आता पंढरपूर शहर आणि ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या तब्बल 1475 वर पोहोचली.

पंढरपूर शहराचा हद्दवाढ भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इसबावी मध्ये तब्बल 31 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत.

मंगळवारी रात्री बारा पर्यंतच्या कोरोना अहवालानुसार पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव गावात 21 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत तर भोसे गावांमध्ये 2 एकलासपुर 7, करकंब मध्ये 2, कासेगाव 1, खेड भाळवणी 1, कोर्टी 1, लक्ष्मी टाकळी 16, लोणारवाडी 3, ओझेवाडी 5 रोपळे 3 , शिरगाव 1, सुस्ते 1, वाखरी 1, असे ग्रामीण भागात रुग्ण आढळून आलेत.

पंढरपूर शहर परिसरामध्ये डाळे गल्ली 1 , गांधी रोड 2, गणेश नगर 1, कडबे गल्ली 2 , महाविर नगर 1, माळी वस्ती 1, नामदेव मंदिराजवळ 3, आयटीआय कॉलेज 1, परदेशी नगर 5, रुक्मिणीनगर 3, सांगोला रोड 4 , संत पेठ 5, स्टेशन रोड 2, तुळशिनगर 1, उजनी कॉलनी 1, वाल्मिकीनगर 4, विजापुरे गल्ली 3, ही शहरातील आकडेवारी आहे.

आज बुधवारी शहरातील संत पेठ परिसरामध्ये रॅपिड एंटीजन टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये जवळपास 90 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. तर उपजिल्हा रुग्णालयांमध्ये घेतलेल्या रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेत. खासगी लॅबमध्ये 13 रुग्ण आढळले आहेत.

मंगळवारी मध्यरात्री पर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 136 तर बुधवारी दिवसभर घेतलेल्या टेस्टमध्ये 125 असे 261 कोरोना बाधित रुग्णांची नोंद पंढरपूर मध्ये झाली.