Home पंढरपूर “त्या” कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले “इतके” मित्र,नातेवाईक आणि इतर . मात्र...

“त्या” कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आले “इतके” मित्र,नातेवाईक आणि इतर . मात्र कोणाच्या संपर्काने झाली बाधा हे शोधण्याचे प्रशासनासमोर आव्हान.

1356
0

पंढरपूर :- आषाढी यात्रेचा सोहळा अवघ्या काही तासांवर आला असताना पंढरपूरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने एकच खळबळ माजलीय. या कोरोना बाधित शिक्षकाच्या संपर्कात तब्बल १४५ लोक आले आहेत. यामध्ये हायरिस्क संपर्क ५१ तर लोरिस्क व्यक्तींची संख्या ९४ आहे. असे एकूण १४५ जणांचा थेट संपर्क आला आहे.
या कोरोना रुग्णाने नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि काही संघटना आणि समाज सेवकांचा कोवीड योध्दा म्हणून २३ जून रोजी सन्मान केला होता. तेच आज कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. या कार्यक्रमासह इतर कार्यक्रमामध्ये १७ जण हे हायरिस्क तर १५ लोक लोरिस्क मध्ये आहेत. या रुग्णाचे १६ ते २३ पर्यंत त्यांच्या शाळेतील ८० सहकाऱ्यांच्या संपर्कात आले होते. यापैकी १४ हायरिस्क तर ६६ जण लोरिस्क मध्ये आहेत. २४ जून रोजी ते संचालक असलेल्या बॅंकेच्या बैठकीला गेल्यानंतर २५ अधिकारी, कर्मचारी आणि संचालकांचा या रुग्णाशी संपर्क झाला. यामध्ये १२ जण हायरिस्क तर १३ जण लोरिस्क मधील आहेत.
महत्त्वाचे म्हणजे आरोग्य कर्मचारी किंव्हा इतर वैद्यकीय कर्मचारी असे ८ जण सध्या हायरिस्क मध्ये आहेत. असे १४५ जण सध्या या रुग्णाच्या संपर्कात आले आहेत.

कोणामुळे झाली बाधा?
गेली तीन महिने पंढरपूरच्या स्थानिक रहिवाशांना कोरोनाची बाधा झाली नव्हती. ये रुग्ण सापडले ते पुणे,मुंबई आणि जपान वरुन आलेले होते. एकाही स्थानिकाला ही बाधा झाली नव्हती. आज सापडलेला रुग्ण हा स्थानिक आहे. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून त्यांनी फक्त मंगळवेढ्यालाच एका विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती. त्याशिवाय त्यांनी कुठेच प्रवास केला नाही. त्यामुळे या रुग्णास कोणामुळे बाधा झाली हा सवाल आता उपस्थित केला जातोय. प्रशासनासमोर आता याचे मूळ शोधण्याचे मोठे आव्हान असणार आहे.