Home पंढरपूर आताची मोठी बातमी …… पंढरपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला .

आताची मोठी बातमी …… पंढरपूर शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला .

11048
0

पंढरपूर :- पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती भागात कोरोनाचा रुग्ण सापडल्याने एकच खळबळ माजलीय. एका खासगी सहकारी बॅंकेचा संचालक असणारा हा रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे. एका मोठ्या प्रशालेत ते शिक्षक देखिल आहेत. चार दिवसांपूर्वीच एका डॉक्टरी पेशाच्या अधिकार्याने या रुग्णाची तपासणी केली होती. या रुग्णाची ट्रॅव्हल हिस्ट्री सध्यातरी फक्त मंगळवेढाच दाखवत आहे. प्रदक्षिणा मार्गावरील हा भाग कंटेनमेंट झोन करण्यात येणार आहे. हा रुग्ण अनेकांच्या संपर्कात आल्याची चर्चा आहे. छातीमध्ये कफ आणि ताप असल्याने या रुग्णाचे स्वॅब घेतले होते. आषाढी यात्रेच्या दोनच दिवस अगोदर शहरात रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढलीय. पंढरपूर शहरातील हा पहिलाचा रुग्ण आहे.